महिलांना केंद्रबिंदू ठेवूनच महिला सन्मान योजना: रचना गहाणे

33 टक्के महिला आरक्षण विधेयकाचा जल्लोष

    दिनांक :26-Sep-2023
Total Views |
अर्जुनी मोरगाव,
Mahila Samman Yojana महिलांना केंद्रबिंदू ठेवूनच केंद्रातील मोदी सरकार हे महिलांसाठी विविध योजना व उपक्रम राबवून देशातील महिलांचा सन्मान करीत आहेत. मोदी सरकारने नुकताच 33 टक्के महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर करुन महिलांचा सन्मान वाढविला आहे. लवकरच या विधयेकाची अंमलबजावणी होऊन देशातील महिलांना त्याचा लाभ होणार आहे, अशी माहिती भाजपा महिला प्रदेश महामंत्री रचना गहाणे यांनी दिली.
 
 
Mahila sanman Yojna
 
केंद्र सरकारने 33 टक्के महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर केल्याबद्दल तालुका भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आनंदोत्सव, नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन व जल्लोष करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या आनंद उत्सवाचे औचित्य साधून ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमातंर्गत अमृत कलशात माती जमा करण्यात आली.Mahila Samman Yojana यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष विजय कापगते, जिल्हा परिषद सदस्य जयश्री देशमुख, महिला आघाडी अध्यक्ष गीता ब्राह्मणकर, नगरपंचायत उपाध्यक्ष ललिता टेंभरे, सरपंच मीना शहारे, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री व नगरसेविका ममता भैय्या, नगरसेविका सपना उपवंशी, मंजुषा तरोणे, शितल राऊत, काशी डोये, कुंदा डोंगरवार, आशा नाकाडे, अर्चना झेलकर, शितल राऊत आदी उपस्थित होत्या.