भक्तगण देणार आज लाडक्या बाप्पाला निरोप

घरीच करा मूर्तीचे विजर्सन, निसर्गप्रेमींचे आवाहन

    दिनांक :28-Sep-2023
Total Views |
गोंदिया, 
Ganpati Bappa : जिल्ह्यात अनंतचर्तुदशी गुरुवार, 28 सप्टेंबर रोजी मांगल्य, पावित्र्य व उत्साहाचे प्रतिक असलेल्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. दरम्यान, घरोघरी असलेल्या गणेश मूर्तीचे घरीच विजर्सन करण्याचे आवाहन निसर्गप्रेमींनी केले आहे. यंदा जिल्ह्यात 673 सार्वजानिक गणपती, 395 गावांत एक गाव एक गणपती व 5471 घरात बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. दहा दिवस विविध धार्मिक, सामाजिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजनासह गणरायाची भक्तीभावाने पुजन, दर्शन केल्यावर गुरुवारी वाजतगाजत, श्रद्धेने निरोप देण्यात येणार आहे. जवळील तलाव व नदीमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करताना निर्माल्यही विसर्जीत करण्यात येईल.
 
Ganpati Bappa
 
मात्र गणेशमूर्ती Ganpati Bappa ही शाडूच्या मातीचीच असावी, अशी अपेक्षा असताना मागील काही वर्षात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीही बाजारात विक्रीसाठी येत आहेत. या मूर्त्या वजनाने हलक्या व सुंदर दिसत असल्याने गणेशभक्ताचाही या मूर्त्या घेण्याकडे कल दिसून आला आहे. मात्र या पीओपीच्या मूर्त्या तलाव, नदी वा विहिरीत विसर्जित केल्यास अनेक दिवस विरघळत नाही. परिणामी पर्यावरणाचा तोल बिघडतो. तसेच तलाव व नदीतील पाणी वाढत्या तापमानाने कमी झाल्यावर या मूर्त्या उघड्यावर पडलेल्या असतात. ही श्रीगणेशाची विटबंनाच आहे. त्यामुळे घरोघरी गणरायाची स्थापना करणार्‍या श्रीभक्तांनी घरातीलच मोठा टब, ड्रम वा टाक्यात श्रीमूर्ती व निर्माल्यचे विसर्जन करावे व पर्यावरण समतोल राखण्यास हातभार लावावा, असे आवाहन निसर्गप्रेमींनी केले आहे.
 
 
मूर्तीच्या मातीत लावा झाड..
घरी विराजमान Ganpati Bappa गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यानंतर पाण्यात मूर्ती व्यवस्थित विरघळली की या पाण्यातील माती एका कुंडीमध्ये टाकावी व त्यात वृक्षारोपन करावे. त्यामुळे श्रद्धेसह पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल.