पुणे,
Heavy rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच आगामी दोन दिवसात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे शहर परिसरात मध्यम स्वरूपाचा, तर घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील चार दिवस पुणे शहर आणि (Heavy rain) परिसरात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. त्यामुळे पुणेकरांना अनंत चतुर्दशी दिवशीही पावसाची अनुभूती येणार आहे. शहरात ढगाळ वातावरणाची स्थिती कायम असून, अधूनमधून उन्हाचे सावटही पाहायला मिळत आहे. मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असताना राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.