साखरखेर्डा परिसरात मेघगर्जनेसह पाऊस अनेकांच्या दुकानात शिरले पाणी

29 Sep 2023 19:27:47
साखरखेर्डा, 
Rain in Sakharkherda परिसरात मेघगर्जनेसह धुवाधार पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली असून बाजाराचा दिवस असल्याने अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे .
 
 
Rain in Sakharkherda
 
साखरखेर्डा आणि परिसरात पावसाने दि. 29 सप्टेंबर रोजी दुपारी हजेरी लावून एकच धांदल उडाली . आठवडी बाजार असल्याने अनेक भाजी पाल्याची दुकाने रस्त्यावर थाटलेली होती . दुपारी दोन वाजता आकाशात ढग दाटून आले . नेमका बाजार भरलेला असताना पावसाने चांगलीच हजेरी लावली . किरकोळ व्यापार्‍यांची धांदल उडाली. Rain in Sakharkherda अनेक भाजीपाल्याची दुकाने वाहिली . येथील एस ई एस हायस्कूल यांनी बांधलेल्या दुकानातही पाणी शिरल्याने मालाचे नुकसान झाले आहे . शारंगधर अर्बन को - ऑप . सोसायटी मध्ये पाणी शिरले होते . बसस्थानक परिसरात असलेल्या तलावाच्या पाणी वाटा बंद झालेल्या असल्याने मुंख्य नालीच्या चेंबर मधून पाणी वर आले . त्यामुळे अंडरग्राऊंड दुकानातील किराणा भुसार मालाचे नुकसान झाले आहे. यावर्षी प्रथमच भागावती नदी दुथडी भरून वाहत आहे . पावसाने जेवढा फायदा झाला तेवढेच नुकसान करुन गेला आहे . स्थानिक ग्राम पंचायतीने मुंख्य नालीच्या पाणी वाटा मोकळ्या करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे .
Powered By Sangraha 9.0