मंगरूळनाथ,
Vasantrao Naik Junior College युवक सेवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशीम द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेमध्ये स्थानिक श्री वसंतराव नाईक कला व श्री अमरसिंग नाईक वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची मुलींची खो खो चमू अंतिम सामना जिंकून विभागीय स्तरावर होणार्या स्पर्धे करिता जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. विशेष म्हणजे याच महाविद्यालयाची मुलांच्या खो खो चमूने सुद्धा अंतिम फेरीमध्ये धडक मारली होती, परंतु काही तांत्रिक चुकीमुळे त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन नावलौकिक संपादन करावे याकरिता या महाविद्यालयाचे अध्यक्ष आ. अ. राठोड सतत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रोत्साहित व मार्गदर्शन करीत असतात. त्याचाच परिपाक म्हणजे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. एस. जी. ढाकुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयाची मुले व मुलींची दोन्ही खो खो चमू जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नेत्र दीपक कामगिरी करू शकले. Vasantrao Naik Junior College विभागीय स्तरावर पोहोचणार्या मुलींच्या खो खो चमूमध्ये आरती वानखडे कर्णधार, लक्ष्मी कव्हर, मोनिका बिहाडे खुशी राठोड प्रीती जाधव, आरती जाधव, ऋतुजा खोंड, पूजा बरगे, शेजल कटके, अनु पवार, पूजा हिंगमिरे, वैष्णवी जाधव, गौरी जाधव, सिद्धी गायकवाड, मोहिनी इंगोले, साक्षी कदम, मनीषा ढोके इत्यादी मुलींचा समावेश होता. संस्थेचे अध्यक्ष आ. अ. राठोड, सचिव अश्विन नाईक, मानद कार्यकारी अधिकारी डॉ. एल. के. करांगळे, कोषाध्यक्ष पी. पी. इंगोले, महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एम. वडगुले, प्रा. एस. जी. ढाकुलकर व तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी विजेत्या खेळाडूंना मार्गदर्शन केले.