जैविक इंधनाचे जागतिक संघटन !

29 Sep 2023 18:43:10
दृष्टिक्षेप
- डॉ. उदय निरगुडकर 
 
bio fuel-pollution आजची जगासमोरची मोठी समस्या इंधनाची आहे. त्याहून मोठी समस्या स्वस्त इंधनाची...! त्याहून मोठी समस्या हरित स्वस्त इंधनाची आणि त्याहून मोठी समस्या ही निरंतर हरित स्वस्त इंधनाची. याविषयी आता शास्त्रज्ञांमध्ये दुमत नाही. म्हणूनच जी-२० मध्ये देशोदेशीचे राष्ट्रप्रमुख आणि तज्ज्ञ यांचे लक्ष केंद्रित झाले होते ते जगाला भेडसावणाऱ्या इंधन समस्येवर. bio fuel-pollution जैविक इंधनाचे महत्त्व समजून घेण्यासाठी जैविक इंधन म्हणजे काय ते समजून घेऊ या. या क्षेत्रात सर्वात प्रथम संशोधन आणि निर्मिती कोणी केली असेल तर ती ब्राझील या देशाने. मोठा संपन्न आणि सुपीक देश. भारताच्या तिप्पट जमीन, एक षष्ठमांश लोकसंख्या आणि जगातला २२ टक्के गोड्या पाण्याचा साठा. bio fuel-pollution त्यामुळे सर्वत्र सुजलाम् सुफलाम्! इथेच पहिल्यांदा उसापासून इथेनॉल निर्माण करून त्याचा उपयोग मोटार कारमध्ये पेट्रोल अथवा डिझेलबरोबर मिक्स करण्यासाठी करण्यात आला. अर्थातच पेट्रोल इथेनॉलच्या कित्येक पटीने महाग आणि प्रदूषणकारी इथेनॉल मात्र खूपच स्वस्त आणि इको फ्रेंडली ! bio fuel-pollution त्यामुळे ब्राझीलमध्ये याचा सर्रास वापर व्हायला लागला तो नव्वदीच्या दशकात! 
  

bio fuel-pollution 
 
 
मला आठवतंय, १९९३ मध्ये एका स्कॉलरशिपवर जवळपास सहा महिने ब्राझीलच्या कानाकोपऱ्यात हिंडलो. तिथे माझे आदरातिथ्य करणारे अनेक जण पेट्रोलपंपावर गेल्यावर इथेनॉलमिश्रित पेट्रोल गाडीत भरायचे. गंमत म्हणजे गाडीची काच खाली केली की, पेट्रोल पंपावर पेट्रोलचा वास येण्याऐवजी दारूच्या गुत्त्यात येतो अगदी तसाच अल्कोहोलचा घमघमाट यायचा. तेव्हा गंमत वाटत होती, पण आज जी-२० मध्ये त्यावर जागतिक पातळीवर चर्चा होताना पाहिली आणि ब्राझीलच्या आद्य संशोधनाचे महत्त्व अधोरेखित झाले. भारतामध्येदेखील असे प्रयोग, संशोधन आणि निर्मिती गेली काही वर्षे सुरू आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात १० राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशात पाच टक्के जैविक इंधन पेट्रोल आणि डिझेलमध्ये ब्लेंड करण्याचे धोरण आखले गेले, हे खूप महत्त्वाचे पाऊल होते. त्यामुळे इथेनॉलच्या निर्मितीला चालना मिळाली. नाही तर तोपर्यंत इथेनॉलचा वापर दारू निर्माण करण्यात आणि तत्सम गोष्टींमध्ये केला जायचा. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेताच, जैविक इंधनावर लक्ष केंद्रित केले. नितीन गडकरी यांनी धडाक्याने धोरणे राबवली. २०२२ पर्यंत १० टक्के ब्लेंडिंगचे उद्दिष्ट आपण पाच महिने अगोदरच पूर्ण केले.
 
 
आता तर कमी पाणी लागणारी मका, बांबू, परळी आणि इतर धान्य यापासून इथेनॉल निर्मितीचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. प्रयोगाकडून आता कारखानदारीकडे त्यांचा प्रवास वेगाने होतो आहे. जैविक इंधनांबद्दल ही जाणीव जागृती केव्हापासून आली? सर्वसाधारणपणे जागतिक तापमानवाढीचा मुद्दा ऐरणीवर आला तेव्हापासून. bio fuel-pollution पण त्याचे वृत्तपत्रांचे मथळे बनले ते १९७३ च्या मंदीने आणि भडकलेल्या तेलाच्या किमतीने. सर्वच राष्ट्रांचं लक्ष पेट्रोलच्या पर्यायाकडे जाऊ लागलं. त्याची वाढती किंमत आणि भीषण प्रदूषण यामुळे जैविक इंधनाच्या प्रयोगांना प्रयोगशाळेत प्रथम क्रमांकाचे स्थान मिळाले. त्यामुळे फक्त उसापासून इथेनॉल यावर न थांबता शेतीमधील इतर धान्य आणि नंतर उरणाऱ्या टाकाऊ गोष्टी अगदी प्राण्यांचे बायप्रॉडक्ट म्हणून संशोधन करण्यात आले. त्याचे रिझल्ट समाधानकारक आल्यावर कोणत्या प्रॉडक्शन लेव्हलला ते परवडणारे होतील, याची गणितं अर्थतज्ज्ञांनी मांडली. bio fuel-pollution हे सर्व इको फ्रेंडली असल्यामुळे अनेक देशांच्या सरकारांनी आपल्या इंधन धोरणात त्याचा समावेश केला. त्यामुळे ऊस म्हटल्यानंतर सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर उभा राहणारा साखर, सहकार, भ्रष्टाचार, राजकारण या समीकरणाला छेद देणारी व्यवस्था बघता बघता उभी राहिली.
 
 
आता फुललेलं हिरवं शेत म्हणजे निव्वळ अन्नधान्य नव्हे तर जैविक इंधन असा नवा फॉम्र्युला घट्ट रुजला. इथेनॉलचा वापर फक्त पेट्रोलच्या ब्लेंqडगसाठी नव्हे तर अगदी चेहऱ्याला लावायच्या क्रीममध्येदेखील व्हायला लागला. या इथेनॉल निर्मितीत फस्र्ट जनरेशन इथेनॉल, सेकंड जनरेशन इथेनॉल अशा अनेक ग्रेड उपलब्ध आहेत. bio fuel-pollution परदेशातील अनेक विद्यापीठांमधून आणि आपल्या देशातही यावर उत्तम संशोधन सुरू आहे. याचा अर्थ सर्वकाही आलबेल आहे असे नव्हे. अशा प्रकारे जैविक इंधनाच्या निर्मितीवर अनेक अर्थतज्ज्ञ आणि शेतीतज्ज्ञ सडकून टीकाही करीत आहेत. त्याचाही परामर्श घेणे गरजेचे आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर इथेनॉलसाठी शेतीयोग्य जमीन लागवडीखाली आणणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आणि जगातील अन्नधान्याचा तुटवडा आणि त्याची आकडेवारी समोर ठेवली जात आहे. bio fuel-pollution शेतीसाठी जमीन लागवडयोग्य करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली जाते. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते असे दाखले देताना जागतिक तापमानवाढीची आकडेवारी समोर ठेवली जात आहे. तरीदेखील जैविक इंधनाच्या निर्मिती आणि वापरात दरवर्षी चार टक्क्यांनी वाढ होत आहे.
 
 
bio fuel-pollution प्रश्न फक्त जंगलतोडीचा आणि लागणाऱ्या अवाढव्य शेतजमिनीचा नाही तर एक दीर्घकालीन धोरण म्हणून हे योग्य ठरणार आहे का असा आहे. शेतीला लागणाऱ्या जमिनीपेक्षा अशी शेती करण्यासाठी जे कार्बन उत्सर्जन होते, त्यामुळे पृथ्वीवरील तापमानवाढीची गती वाढते हेदेखील तितकेच सत्य आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर ही टीका अनाठायी नाही. म्हणूनच जंगलात सापडणाèया पाम वृक्षापासून पाम तेलाचा उपयोग जैविक इंधनासाठी केला जावा याकरिता संशोधन सुरू झाले आणि ते कमालीचे यशस्वी ठरले. त्यातून मिळणारा गुंतवणुकीचा परतावा अत्यंत आवश्यक होता. bio fuel-pollution पण आज त्याचे ८० टक्के उत्पादन अन्न आणि सौंदर्यप्रसाधन याला वापरले जाते आणि अवघे २० टक्के जैविक इंधन निर्मितीसाठी वापरले जाते. इथे मला काही ऑटोमोबाईल कंपन्यांचा छुपा विरोध आहे हे मांडावे लागेल. अशा प्रकारच्या इथेनॉल ब्लेंडिंगमुळे इंजिनमधील पार्ट वारंवार बदलावे लागत नाहीत. त्यामुळे अनेक ऑटोमोबाईल कंपन्या अशा प्रकारे जैविक इंधनाच्या फ्लेक्सी फ्युएल पर्यायासाठी उत्सुक नसतात.
 
 
पण आज ब्राझील, जपान अशा अनेक देशांमध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर यशस्वीरीत्या केला जात आहे आणि अन् सुरक्षेबद्दल म्हणाल तर जैविक इंधन पर्याय उपलब्ध झाल्यामुळे तेलाच्या आयातीतून आपण तब्बल ७३ हजार कोटी इतके परकीय चलन तर वाचवलेच; उलटपक्षी या इथेनॉल निर्मितीसाठी शेतकऱ्यांना तब्बल ७६ हजार कोटी वाटण्यात आले. याचाच अर्थ जैविक इंधनामुळे शेतीची पत सुधारली. bio fuel-pollution संपूर्ण जग इलेक्ट्रिक इंधनावर चालणे कठीण आहे. त्यामुळे नेट झिरोकडे जाण्यासाठी इथेनॉल अथवा बायोगॅस हाच राजमार्ग आहे. अर्थातच हायड्रोजन हा इंधन म्हणून अंतिम पर्याय आज तरी दिसत आहे. वाचकहो, जगाचा इंधन नकाशा वेगाने बदलत आहे. ‘हनीबल' या अमेरिकन कंपनीने १०० टक्के जैविक इंधन वापरून विमानाचे उड्डाण यशस्वी केले तर भारतात एअर एशियाने पुण्याहून दिल्लीला एक टक्का जैविक इंधन मिसळून उड्डाण यशस्वी करून दाखवले. bio fuel-pollution हा वापर वाढवायचा असेल तर आपल्याला वर्षाला १४ कोटी लिटर केवळ विमान उड्डाणासाठी याच्या योग्य असे जैविक इंधन बनवावे लागणार आहे.
 
 
याचाच अर्थ पाच लाख शेतकऱ्यांना रोजगार निर्मितीची संधी आहे. ही आकडेवारी फक्त एक टक्का ब्लेंडिंगची आहे. हा आकडा पाच टक्क्यांवर नेला तर कल्पना करा काय चित्र असेल! म्हणूनच जी-२० या जागतिक परिषदेत ९ सप्टेंबर रोजी ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स याची घोषणा करण्यात आली. bio fuel-pollution यात भारत, अमेरिका आणि ब्राझील या देशांचा प्रमुख सहभाग असणार आहे. अशा प्रकारच्या संघटनांची गरज काय, तर ‘वेस्ट'पासून ‘बेस्ट' बनवण्यासाठी. इथेनॉल आणि बायोडिझेलचा वापर वाढवण्यासाठी. देशोदेशींच्या जैविक इंधन धोरणात सुसूत्रता आणण्यासाठी. जैविक इंधनाच्या जागतिक बाजारपेठेत आपला वाटा फक्त तीन टक्क्यांचा आहे. तेव्हा ही अफलातून संधी आहे. जैविक इंधन युगाची ही केवळ सुरुवात आहे.
Powered By Sangraha 9.0