अशीही लोकसेवा !

nagpur-flood-help हृदयस्पर्शी होता हा अनुभव

    दिनांक :29-Sep-2023
Total Views |
नागपूर,
nagpur-flood-help अतिवृष्टीमुळे सेवा वस्तीतील काही भाग जलमय झाले होते आणि तिथे मदत म्हणून भागातील स्वयंसेवक, यांनी पोळी भाजी किंवा मसाले भात व एक पाण्याची बाटली बी.आर. मुंडले शाळेत जमा करावी. nagpur-flood-help असा संदेश गजानन नगर शाखेच्या ग्रुपवर सोमलवाडा भागातर्फे देण्यात येताच, मी लगेच शाखेचे ज्येष्ठ नागरिक गोपाळ अपराजित यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडे मी स्वत: पोळी भाजी घेऊन गेलो. nagpur-flood-help
 
 

nagpur-flood-help 
 
 
तुमच्या घरचासुद्धा डबा मी घेऊन जातो असे सांगितले. nagpur-flood-help त्यांच्याकडे महालक्ष्मीची पूजा होती. सारंग अपराजित यांना ही माहिती समजताच त्यांनी सकाळी आणि संध्यकाळी जवळ जवळ १५० पॅकेट मसाला भात स्वतः तयार करून मला दिला आणि आणखी काही मदत लागत असेल तर कळवा, असे त्यांनी म्हटले. nagpur-flood-help मी मसाले भात आणि पोळी भाजीच्या पिशव्या घेऊन बी.आर. मुंडले शाळेत पोचलो. गरजूंना वेळीच मदत मिळाली. हा अनुभव हृदय स्पर्शी होता.
सौजन्य : सुरेश चव्हारे, संपर्क मित्र