मुळावेकर डॉ. पंकज कदम चांद्रयान-3 मोहिमेत महत्वाच्या भूमिकेत

    दिनांक :03-Sep-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा या लहानशा गावातील मूळ निवासी, येथील जेडीआयईटीमधून केमिकल इंजिनिअरिंग शाखेतून 2014 मध्ये बीटेक झालेले Dr. Pankaj Kadam डॉ. पंकज कदम यांनी चांद्रयान-3 मोहिमेत महत्वपूर्ण सहभाग नोंदवला आहे. पंकज कदम यांनी बीटेकची पदवी घेतल्यानंतर वाराणसी आयआयटीतून एमटेक पूण केले. त्यानंतर कानपूर आयआयटीतून पीएचडी करून ते भारतीय अंतराळ संशोधन केंद्रामध्ये शास्त्रज्ञ या पदापर्यंत पोहचले.
 
Dr. Pankaj Kadam
 
पीएचडी करताना इस्रोने घेतलेल्या परीक्षेत Dr. Pankaj Kadam पंकज कदम यांची एकट्याचीच संपूर्ण महाराष्ट्रातून शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली होती. सध्या ते सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर श्रीहरीकोटा येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ते लाँच व्हेईकल ग्रुप जसे की, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही रॉकेटकरिता लागणार्‍या इंधनावर संशोधन करीत आहेत. चंद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणात डॉ. पंकज कदम यांची महत्वाची भूमिका होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी परिश्रम आणि जिद्दीने हे यश प्राप्त केले असून यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसह विशेषत: प्राचार्य डॉ. राम तत्त्ववादी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.