नागपूर,
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दरवर्षी होणारी अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. ही तीन दिवसीय समन्वय बैठक 14, 15 आणि 16 सप्टेंबर रोजी होईल. अखिल भारतीय पातळीवरील ही व्यापक समन्वय बैठक वर्षातून एकदा आयोजित केली जाते, अशी माहिती रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली.
या (Rashtriya Swayamsevak Sangh) बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह संघाचे सर्वच पाच सहसरकार्यवाह आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील. बैठकीत 36 संघप्रेरित विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारीही सहभागी होतील. राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टी, भारतीय किसान संघ, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ, संस्कार भारती, सेवा भारती, संस्कृत भारती, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे पदाधिकारी बैठकीत सहभागी होतील. या संघटना आणि त्यांचे पदाधिकारी समाज जीवनातील विविध क्षेत्रांत सेवा, समर्पण आणि राष्ट्रभावनेतून सकि‘य असतात. मागील वर्षी ही बैठक छत्तीसगडच्या रायपूर येथे आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत सहभागी होणार्या (Rashtriya Swayamsevak Sangh) सर्व संघटना सामाजिक जीवनातील विविध अनुभव आणि कामाच्या संदर्भात तपशीलवार चर्चा करतील. बैठकीत सध्याच्या राष्ट्रीय परिस्थितीसोबतच सामाजिक समरसता, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सेवा कार्य, सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षा आदी विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली जाईल, अशी माहिती सुनील आंबेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.