अमृत कलश यात्रेतून आत्मनिर्भर भारताची वाटचाल

अभियान संयोजक राजेश पांडे यांचे प्रतिपादन
मेरी माटी, मेरा देश अभियानाचा प्रारंभ

    दिनांक :06-Sep-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत असा नारा देत जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच क्रमात (Amrit Kalash Yatra) अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची वाटचाल होत आहे. त्यामध्ये 140 कोटी भारतीय नागरिकांचा सक्रिय सहभाग असणार आहे, असे प्रतिपादन ’मेरी माटी, मेरा देश’ अभियानाचे संयोजक राजेश पांडे यांनी केले.
 
Amrit Kalash Yatra
 
भारतीय जनता पक्ष ग्रामीणच्या वतीने बुधवारी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून अमृत कलश यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान शहीद भगतसिंग यांच्या स्मारकाला अभिवादन करून व तिरंगी ध्वज दाखवून ही Amrit Kalash Yatra यात्रा जिल्ह्यात रवाना झाली दरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष खा. अनिल बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेला सुरुवात झाली. प्रमुख म्हणून माजी आमदार रमेश बुंदिले, पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, लोकसभा संयोजक जयंत डेहनकर, निवेदीता चौधरी, नितीन गुडधे, विवेक गुल्हाने, प्रवीण तायडे, गोपाल चंदन, राजेश वानखडे, रावसाहेब रोठे, मदन पाटील बायस्कार, बाबाराव पाटील बरवट, बाळासाहेब वानखडे, समीर हावरे, विशाल काकड, रुपेश लहाने, पद्माकर सांगोळे, विलास कविटकर, दत्तात्रय गेडाम, श्याम गंगराडे, सोपान गुडधे, अंजली तुमराम, अर्चना मुरूमकर, किरण देशमुख, अक्षरा लहाने यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सिद्धार्थ वानखडे यांनी केले.
 
 
गुलामगिरीची मुळे उखडून फेका : डॉ. बोंडे
2014 पूर्वी भारत चौदाव्या क्रमांकावर होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने विकासाचा पथा पादक्रांत करत आहे. ज्या ब्रिटनने भारतावर राज्य केलं त्या ब्रिटनला मागे टाकत भारत जगातली चौथी लोकशाही म्हणून गतीने विकसित होत आहे. 2047 पर्यंत जगातील क्रमांक एकचा देश म्हणून भारत उभा राहिल. Amrit Kalash Yatra अमृत कलश यात्रा हे त्याच प्रयत्नचे मुहूर्तरूप आहे. सर्व समाज घटकांनी या नव्या चळवळीत योगदान द्यावे.’न भूतो न भविष्यती’ असे अमृत उद्यान दिल्लीत तयार होणार आहे. त्यासाठी देशातल्या विविध भागातील पवित्र माती त्या ठिकाणी कलशाच्या माध्यमातून पोहोचवली जाणार आहे. येणार्‍या पिढ्यांना हा वारसा देताना गुलामगिरीची मुळे उखडून फेकून बलशाली भारताकडे आपण वाटचाल करत असल्याचे खा. अनिल बोंडे यावेळी म्हणाले.