साई मंदिरात कृष्ण जन्म अन् अवतरला संतमेळा

06 Sep 2023 19:54:02
वर्धा,
Sai Temple मुळच्या अमरावती जिल्ह्यातील भागवत कथाकार वैभवीश्री गेल्या महिन्यात वर्धेतील साईमंदिरात भागवतकथेकरिता आल्या अन् त्या वर्धेकरांच्या प्रेमात पडल्या. जाता जाता त्यांनी गोकुळाष्टमीत तीन दिवस साई मंदिरात आळंदी येथील गुरूकुलातील मुलांचे ‘पांडुरंगी’ हा तीन दिवसांच्या संत चरित्र दर्शनाचा कार्यक्रम घेण्याची इच्छा व्यक्त केेली आणि साई मंदिर विश्‍वस्तांनी त्याला मुर्तरूप दिले. गेल्या दोन दिवसांत साई मंदिरात अक्षरश: संत मेळा अवतरला आणि वर्धेकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले.श्रीकृष्ण जन्माष्टीनिमित्त येथील साई मंदिरात पांडुरंगी सदृश्य व संगीतमय संतचरित्र दर्शन कार्यक्रमाचे आयोजन 5 ते 7 सप्टेंबर या दरम्यान करण्यात आले आहे. तीन दिवसीय कार्यक्रमात पांडुरंगी सदृश्य व संगीतमय संतचरित्र दर्शनाचा कार्यक्रम सुरू असून या कार्यक्रमाचा शेकडो भक्तांनी लाभ घेतला आहे.
 
 
sai mandir
 
वैभवीश्री निर्मित व दिग्दर्शित, मदनगोपाल शर्मा लिखीत पांडुरंगी कार्यक्रमात संतांचे चरित्र, सदृश्य व संगीतमय नाट्यरुपाने सादर करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील संतांचे चरित्र दृश्य रुपामध्ये जनसामान्यांपुढे यावे, हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे. मंगळवार 5 रोजी संत मीराबाई यांचे जीवनचरित्र दृश्य व संगीतमय नाट्यरुपाने सादर करण्यात आले.Sai Temple आळंदी येथील सामान्य कुटुंबातील संत ज्ञानेश्‍वर महाराज गुरुकुलातील 5 ते 15 या वयोगटातील 12 मुलं आणि 6 मुली अशा 18 बालकलाकार सादरीकरण करीत आहेत. बुधवार 6 रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गुरुवार 7 रोजी दहीहंडी, गोपालकाला आणि जनाबाई चरित्र सादर करण्यात येणार आहे.तीन दिवसीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री साईसेवा मंडळाचे सचिव सुभाष राठी, चंदू राठी, अशोक झिलपे, विठ्ठल व्यवहारे, संजू पोफळी, जगदीश चुरा, टिपन्ना भंडारी, नत्थू कुबडे, जगदीश पोद्दार, महिला साईसेवा मंडळाच्या वृषाली हिवसे, शशी राठी, गायत्री पोफळी, संतोष पनपालीया, मनीषा जंगीतवार आदी परिश्रम घेत आहेत.
Powered By Sangraha 9.0