मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा ‘येलो अलर्ट’

    दिनांक :06-Sep-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
heavy rain हवामान विभागाने जिल्ह्यासाठी 6 सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट तर 7 सप्टेंबर रोजी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. या अलर्टनुसार जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या कालावधीत वीज पडून होणारी जीवितहानी व वादळी वार्‍यामुळे घरांची भिंत, टिनपत्रे पडून होणारी जीवित व वित्तहानी टाळण्याकरिता प्रशासनाने जारी केलेल्या उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.विजांचा कडकडाट व पाऊस असताना सचेत व दामिनी अ‍ॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा. वादळी वारा, विजा चमकत असताना घराच्या खिडक्या व दरवाजे बंद ठेवावे, घराचे दरवाजे खिडक्या, कुंपणापासून दूर राहा, मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनिटे घराच्या आतच रहावे.
 
 
पाऊस
 
घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवार्‍याच्या ठिकाणाकडे जावे. ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटरसायकल, सायकल यांपासून दूर रहावे. गाडी चालवीत असल्यास, सुरक्षितस्थळी जाण्याचा प्रयत्न करावा. उघड्यावर असल्यास, शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे.heavy rain जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा.मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर रहावे. जंगलामध्ये दाट, लहान झाडाखाली, उतारावर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवर दरीसार‘या सुरक्षित खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करावा. वीज पडल्याने, वज्रघात झाल्यास त्वरित रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत घ्यावी. ओल्या व थंड परिस्थितीत बाधित व्यक्ती व जमिनीच्यामध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा. जेणेकरून हायपोथेरेमियाचा धोका कमी होईल.हवामान खात्याच्या इशार्‍यामुळे शेतामध्ये पीक काढणीस आलेल्या पिकांची तत्काळ काढणी करून घ्यावी. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीस ठेवलेले धान्य विक्रीस वेळ असल्यास ताडपत्रीने झाकून सुस्थितीत ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.