नागपूर ,
National Sports Day हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त Vidarbha Institute of Technology, नागपूर येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. सदानंद देशपांडे, उपप्राचार्य डॉ. निलेश बोडणे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाचा इतिहास व महत्त्व सांगितले.
National Sports Day नंतर N.S.S. कार्यक्रम अधिकारी सौरभ लवाटे यांनी आपल्या दैनंदिन जीवनात खेळ आणि शारीरिक हालचालींच्या महत्त्वाविषयी जागरुकता वाढवली आणि तणाव कमी करण्यासाठी आणि चारित्र्य, संघकार्य, शिस्त आणि चिकाटी निर्माण करण्यासाठी “समावेशक आणि तंदुरुस्त समाजासाठी खेळांना सक्षम करणारा” आणि “फिट इंडिया मिशन”ला आवाहन करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवली होती. National Sports Day त्यानंतर मैदानी खेळ व्हॉलीबॉल, टग ऑफ वॉर आणि इनडोअर गेम्स टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ अशा विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला. National Sports Day विभागाचे प्रमुख प्रा. गोठेकर यांनी आभार मानले. क्रीडा समितीचे प्रा. आदित्य पाटील, प्रा. हिमांशू म्हात्रे, प्रा. प्रमोद भगत, प्रा. रोशन गायधने, प्रा. सनम गौरखेडे यांनी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे आभार मानले.
सौजन्य : मनोज विरळकर, संपर्क मित्र