संस्कृती
- अमिय भूषण
Ram-janaki Mithila Nagari : पौराणिक शहर मिथिला सध्या उत्सवाच्या वातावरणात आहे. त्याचे मूळ कारण आहे ‘पहुनवा राघो’. स्थानिक नागरिकांसाठी 2023 चा डिसेंबर महिना खरोखरच अनोखा होता. याच डिसेंबर महिन्यात येथे राम-जानकीचा विवाह सोहळा पार पडला. खरे तर हा चार दिवसांचा शुभ सोहळा म्हणजे वैदिक आणि लौकिक परंपरांचा सुंदर मिलाफ आहे.
गंगेच्या किनार्यापासून कमला विमलाच्या तीरापर्यंतचा हा प्रवास जरी धनुष्य यज्ञाच्या निमित्ताने असला तरी त्याचा खरा उद्देश श्रीराम आणि सीता यांचे मिलन हाच होता. सीता स्वयंवरातील विजयानंतर त्यांचा विवाह अगहन शुक्ल पक्ष पंचमीच्या शुभ मुहूर्तावर झाला.
हा संपूर्ण कार्यक्रम ‘कमला बचाओ’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आला आहे. कमला हे नदीचे नाव आहे. अभियानाचे प्रमुख विक्रम यादव यांच्या मते, निसर्ग आणि संस्कृतीचे संवर्धन आणि जनजागृतीसाठी हा एक पवित्र उपक‘म आहे. या मोहिमे अंतर्गत ते नियमितपणे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करतात.
श्रीराम-जानकी विवाह समारंभाच्या निमित्ताने संपूर्ण जगभरातून लोक मिथिलानगरीत येतात. आजूबाजूला नजर टाकली तर सर्वत्र विवाह सोहळ्यासारखे वातावरण दिसते, जणू स्वत:च्या अगदी निकटच्या, सख्ख्या नातेवाईकाचेच लग्न पार पडत आहे. यावेळी रस्त्यांपासून मंदिरांपर्यंत मिथिलेतील महिलांचे समूह विवाहाची गाणी गाताना आणि नृत्य करताना दिसतात. तर दूरदूरवरून आलेले साधूंचे जथ्थे मंदिर आणि नदी, तलाव घाटावर कीर्तन करताना दिसतात.
Ram-janaki Mithila Nagari : मिथिलागरीत सध्या सर्वत्र अतिशय आनंदाचे वातावरण आहे. याचे कारण आहे ‘पहुनवा राघो’. स्थानिक नागरिकांसाठी 2023 चा डिसेंबर महिना खरोखरच अनोखा होता. याच डिसेंबर महिन्यात येथे राम-जानकीचा विवाह सोहळा पार पडला. खरे तर हा चार दिवसांचा शुभ सोहळा म्हणजे वैदिक आणि लौकिक परंपरांचा सुंदर मिलाफ आहे. श्रीराम आपले गुरू विश्वामित्रांसह सिद्धाश्रमातून मिथिला येथे आले होते. गंगेच्या किनार्यापासून कमला विमलाच्या तीरापर्यंतचा हा प्रवास जरी धनुष्य यज्ञाच्या निमित्ताने असला तरी त्याचा खरा उद्देश श्रीराम आणि सीता यांचे मिलन हाच होता. सीता स्वयंवरातील विजयानंतर त्यांचा विवाह अगहन शुक्ल पक्ष पंचमीच्या शुभ मुहूर्तावर झाला. यावेळी भरतचा मांडवीशी, लक्ष्मणाचा उर्मिलाशी आणि शत्रुघ्नचा विवाह श्रुतिकीर्तिशी झाला होता.
दशरथ राजाचे चारही पुत्र मिथिलानरेशचे जावई झाले. Ram-janaki Mithila Nagari या चारही राजकुमारांच्या विवाह समारंभानिमित्त गंगेच्या किनार्यापासून ते हिमालयाच्या खोर्यापर्यंत दरवर्षी उत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने संपूर्ण मिथिलानगरीत ‘सीताराम विवाह सोहळा’ साजरा केला जातो. मिथिलेच्या सीमेपलीकडे वसलेल्या भगवान श्रीरामाचे चरित्र निर्माण आणि प्राकट्य भूमी असलेल्या बक्सरमध्येही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथे एक परिक‘माही होते. श्रीरामभक्ती प्रवाहातील प्रसिद्ध संत मामाजी यांच्या आश्रमात या दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पण नेपाळमधील जनकपूरची गोष्टच अनोखी आहे. हे तेच शहर आहे जिथे प्रत्यक्ष हा विवाह सोहळा पार पडला. येथील मणिमंडप रामायणात वर्णित सीता विवाह स्थळ आहे.
यानिमित्ताने जनकपूरच्या प्रत्येक मंदिरात सीताराम Ram-janaki Mithila Nagari विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. शहरवासी आपल्या घरापुढे रांगोळी काढतात आणि सर्वत्र सजावट करतात. तर संपूर्ण शहर या दिवसात दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते. सगळीकडे लोकांची गर्दी दिसते. या विशाल समूहात प्रत्येकजण दर्शनार्थी आहे. या निमित्ताने संपूर्ण जगभरातून लोक इथे जमतात. आजूबाजूला नजर टाकली तर विवाह सोहळ्यासारखे वातावरण दिसते, जणू स्वत:च्या अगदी निकटच्या, सख्ख्या नातेवाईकाचेच लग्न पार पडत आहे. यावेळी रस्त्यांपासून मंदिरांपर्यंत मिथिलेतील महिलांचे समूह विवाहाची गाणी गाताना आणि नृत्य करताना दिसतात. तर दूरदूरवरून आलेले साधूंचे जथ्थे मंदिर आणि नदी, तलाव घाटावर कीर्तन करताना दिसतात.
गीतांमध्ये भक्तीसोबतच हास्य आणि विनोदाचेही बोल आहेत. या Ram-janaki Mithila Nagari विवाह सोहळ्यात वैदिक मंत्र, विधींसोबतच लोकपरंपरांवरही भर दिला जातो. खरे तर वैदिक आणि लौकिक परंपरांचा हा एक सुंदर मिलाफ आहे. येथे विवाह हा एक नव्हे तर चार दिवसांचा उत्सव असतो. राजा जनकाने विवाहाच्या सहा महिन्यांनंतरच आपल्या कन्यांसह लग्नाच्या वर्हाडाला निरोप दिला होता, असेही मानले जाते. विवाहापासून ते ‘विदाई’ पर्यंत डझनभर विधी आहेत. अयोध्येतून प्रतीकात्मक ‘श्रीराम वरात’ (मिरवणूक) दरवर्षी जनकपूरला दाखल होते आणि पुढील अनेक दिवस परंपरांसह धार्मिक विधी पार पडतात. हे लौकिक विधी आचार्य मोदलता रचित ‘विवाह पदावलीनुसार’ पार पडतात. मिथिलानगरीतील या प्रथम श्री सीताराम विवाह आचार्यांनी यासाठी सुमारे चौसष्ट विधी सांगितले आहेत. यासंबंधातील गीते मिथिला भक्त कवींच्या रचनांपासून ते ग‘ामीण स्त्रियांच्या गीतांपर्यंत आढळून येतात व प्रत्यक्षात ती गायिली जातात. येथील विवाहसोहळ्यात स्त्रिया आजही ‘आजु धनवा कुटाऊं श्रीराम जी के और जनकपूर के कोहबर लाल गुलाब तो अयोध्या के कोहबर पान से छबाबल हे’ हे पारंपरिक गीत गातात.
विवाहातील महत्त्वपूर्ण विधी ‘मटकोर’ आणि Ram-janaki Mithila Nagari ‘कोहबर’पासून मंडपापर्यंत ‘सीताराम’ हेच नाव आहे. मटकोर गीतामध्ये जनकपूरची पिवळी माती आणि कमला नदीचा उल्लेख आहे. या नदीवर सीतेसह चारही बहिणी आपल्या सात मैत्रिणींसोबत जात असल्याचाही उल्लेख आहे. मटकोर हा मातृका पूजनाचा लोकप्रकार आहे. येथे विवाहाच्या आदल्या दिवशी कन्या पूजेसाठी नदीकाठी जाते. यावेळी ग्रामदेवता, कुलदेवता, जलदेवता आणि भूमीचे पूजन केले जाते. भगवती, जनकनंदिनी सीता येथील कमला नदीच्या किनारी गेली होती. त्याची आठवण म्हणून दरवर्षी या निमित्ताने मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ही यात्रा जनकपूर शहरस्थित माता सीतेचे वैयक्तिक निवासस्थान ‘सुंदर सदन अग्निकुंड’ येथून सुरू होऊन कमला नदीच्या तीरावर सखुआ मदन घाट येथे समाप्त होते.
हा संपूर्ण कार्यक्रम ‘कमला बचाओ’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आला आहे. Ram-janaki Mithila Nagari अभियानाचे प्रमुख विक‘म यादव यांच्या मते, निसर्ग आणि संस्कृतीचे संवर्धन आणि जनजागृतीसाठी हा एक पवित्र उपक‘म आहे. या मोहिमे अंतर्गत ते नियमितपणे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करतात. दर आठवड्याच्या शेवटी जागृती आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले जाते आणि वर्षातील विवाह पंचमी, जानकी (सीता) नवमी, कार्तिक पौर्णिमा आणि मकर संक‘ांतीच्या दिवशी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कार्तिक पौर्णिमा आणि माघ संक्रांती या कमला मातेच्या प्रकटीकरणाशी संबंधित तिथी आहेत. तर विवाह पंचमी आणि जानकी नवमी या भगवती सीता मातेशी संबंधित महत्त्वाच्या तिथी आहेत.
यंदाच्या मटकोर उत्सवानिमित्त आयोजित भव्य कार्यक‘माला शंकराचार्य अधोक्षानंद सरस्वती प्रामु‘याने उपस्थित होते. यापूर्वीच्या समारंभांमध्येही विविध मान्यवर येऊन गेले आहेत. येथे सर्वात सुंदर विवाह सोहळा मणिमंडप, सुंदर सदन आणि जानकी मंदिराच्या प्रांगणात होतो. तर विवाह सोहळ्याच्या दुसर्या दिवशी जानकी मंदिर परिसरात आयोजित राम कलेवा उत्सवासोबतच ‘श्रीराम वरात’ पुढच्या वर्षी येण्याचे वचन घेऊन अयोध्येला परतते. अशाप्रकारे राम आणि सीता यांच्या प्रेमसूत्रात बांधलेला हा विवाह सोहळा उत्साहात पार पडतो.