रेल्वेस्थानकावरून ’अ‍ॅप’ आधारित टॅक्सी सुविधा

11 Jan 2024 20:28:27
नागपूर,
Railway taxi : मुख्य रेल्वेस्थानकावर प्रवाशांना टॅक्सी सुविधा देण्यासाठी नागपूर विभागातर्फे ’अ‍ॅप’वरील टॅक्सी सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांच्या उपस्थितीत एका प्रवाशांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव, विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त मनोज कुमार यांच्यासह अन्य कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते.
 
Railway taxi
 
या सुविधेमुळे प्रवाशांना रेल्वेस्थानकावरून बाहेर जाण्यासाठी आणि स्थानकावर येण्यासाठी टॅक्सी बुक करता येईल. कोरोनापूर्वी अ‍ॅप बेस्ड टॅक्सीचालकांना रेल्वेस्थानकावरून प्रवाशांची बुकिंगची परवानगी होती; परंतु कोरोना काळात ती बंद करण्यात आली. ऑटोचालकांच्या विरोधामुळे आणि पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे अ‍ॅप बेस्ड Railway taxi टॅक्सीचालक रेल्वेस्थानकावरून प्रवाशांची बुकिंग घेऊ शकत नव्हते. त्यामुळे टॅक्सीचालक स्थानकावर न येता बाहेरून प्रवाशांना गाडीत बसवीत होते. तसेच प्रवाशांना जड बॅग व अन्य साहित्यासह स्थानकावरून मुख्य रस्त्यावर पायी यावे लागायचे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. प्रवाशांच्या सुविधेचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकावरून ’अ‍ॅप’वरील टॅक्सी सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासह पार्किंगसाठी आरपीएफ ठाण्यापासून समोर जागाही उपलब्ध करून दिली आहे.
Powered By Sangraha 9.0