नागपूर,
Nagpur-Ayodhya train : अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे 22 जानेवारी रोजी उद्घाटन झाल्यानंतर येथे जाणार्या भाविकांच्या संख्येमध्ये सर्वाधिक वाढ होणार आहे. त्यामुळे भाविकांच्या सेवेसाठी नागपूर ते अयोध्या थेट रेल्वेगाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी विभागीय रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीच्या सदस्यांनी केली आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
मुख्यत: अयोध्या येथील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. Nagpur-Ayodhya train फेब्रुवारीपासून नागपूरसह विदर्भातील विविध गाव व शहरांमधून अयोध्या येथे जाणार्या भाविकांच्या संख्येत विक्रम वाढ होणार असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे. मध्य रेल्वेने भाविकांच्या मागणीकडे लक्ष देत तातडीने अयोध्येकरिता थेट रेल्वे सुरु करुन भाविकांना श्रीरामाचे दर्शन करुन द्यावेत, अशी मागणी सदस्यांनी केली आहे. प्रवासांना चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रयत्नरत असते.
मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानकावरुन अयोध्या येथे जाणार्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे येथून वंदे भारत सुरु केल्यास प्रवाशांची उत्तम सोय होणार आहे. नागपूर-अयोध्या अशी थेट आणि नियमित Nagpur-Ayodhya train रेल्वेगाडी सुरू करणे नितांत गरज असून रेल्वेने याकडे गंभीरपणे लक्ष घालण्याची गरज आहे. नागपूर ते अयोध्या थेट गाडी सुरू केल्यास विदर्भातील भाविकांनासोबत राज्यातील इतर प्रांतातील नागरिकांची सोय होणार आहे. भाविकांची मागणी लक्षात घेवून तातडीने या मागणीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यामुळे आगामी काळात रेल्वेच्या उत्पन्नात विक्रमी वाढ होणार आहे.
नागपूर-अयोध्या नियमित रेल्वेगाडी Nagpur-Ayodhya train सुरू करण्याची मागणी झेडआरयूसीसी सदस्यांनी निवेदनाव्दारे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळात ब्रजभूषण शुक्ला, दिलीप गौर, रामअवतार तोतला, सुरेश बरडे आदींचा समावेश होता. प्रवाशांच्या विविध सुविधांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तुषारकांत पांडे यांनी मागणीचे निवेदन रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येईल आणि रेल्वे बोर्डाच्या निर्णयानंतर नागपूर-अयोध्या रेल्वेगाडी सुरू करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.