अयोध्या :
AI Security श्रीराम मंदिर परिसरात फि दायीन हल्ल्याचा धोका पाहता एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. AI Security वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार, श्रीराम मंदिर परिसराला सुरक्षा प्रदान करण्यासाठी एक विशेष विभाग तयार करण्यात आला आहे.
AI Security या ठिकाणावरून सुरक्षासंबंधित माहिती समन्वियत केली जाते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्यानिमित्ताने विभागात जवानांची संख्या वाढविण्यात आली आहे. याशिवाय २२ जानेवारीच्या आधी अयोध्या आणि परिसरात धार्मिक दंगल घडवून आणण्याचा संशय व्यक्त होत आहे. याशिवाय फिदायीन हल्ला (पोलिस आणि लष्कराच्या पोशाखात इच्छित ठिकाणी शिरून हल्ला करणे ) होण्याची शक्यता पाहता मंदिर परिसरात एआय सुरक्षा तैनात केली आहे. दरम्यान, नेपाळच्या सीमाभागातही एसएसबी जवान २४ तास गस्त घालत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.