मराठमोळ्या गायकवाड दाम्पत्यास श्रीराम पूजेचा बहुमान

12 Jan 2024 22:14:05
मुंबई :
अयोध्येत Shri Ram Puja प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला ११ हजार व्हीआयपींची उपस्थिती असणार आहे. Shri Ram Puja या दिवशी प्रभू श्रीरामांच्या पूजेचा मान देशभरातील ११ दाम्पत्यांस देण्यात आला आहे.
 
 
Shri Ram Puja
 
Shri Ram Puja त्यात धाराशिव जिल्ह्याच्या काकंब्रा तालुक्यातील मराठमोळ्या गायकवाड दाम्पत्यासही हा बहुमान मिळाला आहे. अयोध्येत अठरापगड जाती आणि सर्वधर्मसमभाव जपत हा दैदिप्यमान सोहळा होत आहे. काही प्रसंग, क्षण आयुष्य अजरामर करतात. असाच एक क्षण श्री तुळजाभवानीच्या अधिष्ठानाने पुण्यभू असलेल्या तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गावचे महादेव गायकवाड यांच्या आयुष्यात आला आहे. त्यांच्या कार्याने त्यांना बहुमान मिळवून दिला. गायकवाड हे निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांचे कार्य इतके समृद्ध आणि सामाजिक उन्नतीचे आहे की त्यामुळे त्यांना प्रभू श्रीरामाच्या पूजेचा मान मिळाला. अयोध्येतील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पूजेसाठी बसण्याचा मान भारतातील ११ कुटुंबाना मिळाला. त्यात महादेवराव गायकवाड उभयता सहभागी होणार आहेत.
Powered By Sangraha 9.0