- 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी शाळांनी सहभागी व्हावे
- उत्कृष्ट शाळांना विविध पारितोषिके
यवतमाळ,
राज्यातील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्यात शाळांप्रती आदर व उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी. त्यामार्फत राज्यातील शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत Mukhymantri Majhi Shala Sundar Shala ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान राबवण्यात येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा हे अभियान राबवण्यात येत असून यासाठी राज्य शासनाकडून विविध पारितोषिकांची घोषणा केली आहे. यामध्ये तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील अव्वल ठरलेल्या शाळांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी तालुकास्तरावर प्रथम पारितोषिके 3 लाख रुपये, द्वितीय पारितोषिके 2 लाख रुपये, तर तृतीय 1 लाख रुपये असून जिल्हास्तरावर प्रथम 11 लक्ष, द्वितीय 5 लक्ष आणि तृतीय पारितोषिक 3 लक्ष रुपये आहे. तसेच विभागीय स्तरावर प्रथम पारितोषिके 21 लाख रुपये, द्वितीय पारितोषिके 11 लाख रुपये तर तृतीय येणार्या शाळेला 7 लाख रुपये असणार आहे. तर राज्यस्तरावर 51 लक्ष रुपयाचे प्रथम पारितोषिके व द्वितीय आलेल्या शाळांना 21 लक्ष रुपये तर तृतीय 11 लक्ष रुपये पारितोषिके घोषित केली आहे.
Mukhymantri Majhi Shala Sundar Shala : जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे व डॉ. जयश्री राऊत, उपशिक्षणाधिकारी डॉ. नीता गावंडे व सदस्य सचिव राजू मडावी व विस्तार अधिकारी तथा नोडल अधिकारी प्रणिता गाढवे यांनी केले आहे.