इस्लामाबाद :
PTI leader killed पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे वरिष्ठ नेता शाह खालिद यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. PTI leader killed ही घटना खैबर-पख्तूनख्वामधील स्वाबी घडली.
PTI leader killed पोलिसांनुसार, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी पीटीआय नेता खालिद यांच्या वाहनासमोर जोरदार गोळीबार केला. अनेक गोळ्या शरीरात शिरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मागील २४ तासांत अन्य एक नेता कलीमुल्ला खान यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दरम्यान, पुढील महिन्यात देशात सार्वत्रिक निवडणूक होत असून, नेत्यांवरील हल्ल्यांच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे.