‘ माय भारत-विकसित भारत’ भाषण स्पर्धा

13 Jan 2024 16:58:17
गोंदिया,
My India-Developed India भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र गोंदिया व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माय भारत-विकसित भारत2047’ विषयावर जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेचे आयोजन स्थानिक नमोद महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. या स्पर्धेतून ममता तुरकरची राज्यस्तरीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे. स्पर्धेचा शुभारंभ गोंदिया शिक्षण संस्था सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. शारदा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी श्रृती डोंगरे, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संगिता घोष, माजी रासेयो जिल्हा समन्वयक डॉ.बबन मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
gondiya
 
यावेळी प्राचार्य डॉ. महाजन म्हणाल्या, युवा शक्ती परिवर्तनाची वाहक आणि परिवर्तनची लाभार्थी आहे. प्रत्येक विद्यालय हे विद्यार्थी आणि युवक यांच्या ऊर्जाला ‘विकसित भारत’चे सामान्य लक्ष्यास प्राप्त करण्याच्या दिशाकरीता आवश्यक आहे. श्रृती डोंगरे म्हणाल्या, युवा शक्ती ही विचारधारा महाविद्यालय आणि महाविद्यालयात युवकांकरीता करियर करण्यास निर्णायक ठरेल. आजचे युवक हे राष्ट्राचे भविष्य असल्याचे सांगून त्यांनी विकसित भारत कसा असला पाहिजे हे सांगितले. स्पर्धेत ममता सेवकराम तुरकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तिची ही राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली. तसेच द्वितीय क्रमांक आकांशा रविंद्र तुरकर, तृतीय क्रमांक अमित ठाकरे यांनी प्राप्त केले. My India-Developed India त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून डॉ. संगिता घोष, डॉ. किशोर वासनिक, डॉ. तारण पटले, डॉ. संजय जगने यांनी कार्य पार पाडले. प्रास्ताविक डॉ. बबन मेश्राम यांनी केले. संचालन पुजा डोंगरे यांनी केले. आभार पुनम दमाहे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता देवकुमार राऊत, डिंपल ढोरे, झामसिंग बघेले, शिवानी हाडगे, मनिष दहिकर, गणेश टेकाम, सागर सुर्यवंशी, अजय फुंडे, विनय मेंढे, प्रीती पुराम, निकिता उके, आरती खोब्रागडे, रोशन कुंभलकर, ओम परमार, रविंद्र कावळे, अत्तदिप वालदे, गुणेश्‍वरी येडे, प्रणाली पारधी आदींनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0