राम मंदिरासाठी ईश्वरानेच नरेंद्र मोदी यांची निवड केली

लालकृष्ण अडवाणी यांचे प्रतिपादन

    दिनांक :13-Jan-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
chosen by God अयोध्येत भगवान श्रीरामांचे भव्य मंदिर बांधण्यासाठी ईश्वरानेच नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी निवड केली होती. chosen by God आमच्या रामजन्मभूमी आंदोलनाचा प्राथमिक उद्देश अयोध्येत राम मंदिर बांधणे इतकाच होता. मात्र, नंतर हे आंदोलन धर्मनिरपेक्षतेचे खरे प्रतीक ठरले. ढोंगी धर्मनिरपेक्षतावादाचा पर्दाफाश झाला, असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी यांनी केले.
 
 
adwani
 
chosen by God लालकृष्ण अडवाणी यांनी २२ जानेवारी रोजीच्या रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औपचारिक निमंत्रण मिळाले आहे. अडवाणी यांनी राष्ट्र धर्म पत्रिकेच्या पुढील विशेष अंकासाठी विशेष लेख लिहिला. रामजन्मभूमीला मुक्त करण्यासाठी अडवाणी यांनी रथयात्रा काढली, त्याला आता ३३ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. chosen by God त्यांनी आपल्या लेखातून या आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या रथयात्रेत अडवाणी यांच्यासोबत होते. त्यावेळी मोदी जास्त प्रसिद्ध नव्हते. मात्र, त्याचवेळी ईश्वराने भगवान प्रभूरामाचे भव्य मंदिर उभारण्यासाठी त्यांना निवडले होते, असे अडवाणी यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.
 
chosen by God ज्यावेळी रथयात्रेला सुरुवात केली, तेव्हा त्याला इतके मोठे स्वरूप येईल, त्याचे आंदोलनात रूपांतर होईल, असे वाटले नव्हते. पुढे जाऊन हेच आंदोलन धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक बनले आणि ढोंगी धर्मनिरपेक्षता उघड झाली. अयोध्येत प्रभू रामाचे मंदिर नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात उभारायचे, असे नियतीने तेव्हाच ठरवले होते, असे अडवाणी यांनी लेखात नमूद केले आहे. chosen by God राम जन्मभूमी आंदोलन राजकीय प्रवासातील सर्वांत निर्णायक आणि परिवर्तनकारी असल्याचे सांगताना अडवाणी यांनी आपल्या अनेक अनुभवांना लेखात उजाळा दिला. त्यांनी आपल्या लेखात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबतच्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख केला. आता रामलला त्यांच्या आसनावर विराजमान होत आहेत. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांची उणिव जाणवत असल्याचे अडवणी यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदींना शुभेच्छा
chosen by God राम मंदिराचे स्वप्न साकार करून रामललाचे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प पूर्ण केल्याबद्दल अडवाणी यांनी आपल्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी रामललाची प्राणप्रतिष्ठा करतील, तेव्हा ते देशातील प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करतील, असेही अडवणी यांनी लेखात म्हटले आहे.