तुम्हाला माहितीये...कोणी काढला प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ?

13 Jan 2024 13:12:05
पुणे,
 
ShriRam-Ayodhya उत्तरप्रदेशातील अयोध्येत साकारत असलेल्या श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना  करण्यासाठी भारतातील ठराविक मोजक्याच विद्वान ज्योतिषांनी मुहूर्त काढले. यामध्ये पुण्यातील पंचांगकर्ते ज्योतिषी गौरव देशपांडे यांचाही सहभाग असून देशपांडे यांनी काढलेल्या २२ जानेवारी, २०२४ च्या मुहूर्तावरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने या मंदिर पुनर्स्थापनेच्या कार्यात पुण्यातील देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांचा असलेला वाटा ही समस्त मराठी जनांसाठी अभिमानाची बाब आहे. ही बातमी वाचलीय का ...  श्रीराम मंदिर परिसरात एआय सुरक्षा तैनात
 

ShriRam-Ayodhya 
 (संग्रहित छायाचित्र - स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्याकडून सन्मान स्वीकारताना गौरव देशपांडे)
 
ShriRam-Ayodhya “श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने २० एप्रिल, २०२३ रोजी आळंदी येथे आले असताना त्यांनी मला बोलावून घेतले. माझा सत्कार करून अयोध्येत साकारत असलेल्या राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सुयोग्य मुहूर्त आपण काढावा, अशी इच्छा व्यक्त केली. ShriRam-Ayodhya त्यांच्या विनंतीला मान देऊन मी २९ एप्रिल रोजी ज्योतिष, मुहूर्त शास्त्र आणि धर्मशास्त्राच्या आधारे सोमवार २२ जानेवारी हा दिवस आणि अयोध्येच्या अक्षांश रेखांशानुसार मेष लग्नावरील विशिष्ट स्थिर नवमांश बघून मुहूर्त काढून हा मुहूर्त त्यांना औपचारिकरीत्या पत्राद्वारे कळविला. ShriRam-Ayodhya अशा पद्धतीने या ऐतिहासिक घटनेसाठी भारतातील निवडक विद्वानांनी मुहूर्त काढले असून सुदैवाने २२ जानेवारी याच दिवशी श्रीरामाच्या मूर्तीची होत असलेली प्राणप्रतिष्ठा ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असणार आहे,” असे गौरव देशपांडे यांनी सांगितले. तुम्ही ही बातमी वाचलीय का ... मॉरिशस देखील झाले राममय...विशेष सुट्टी जाहीर
 
 
भारतीय जनता पार्टी श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा राजकीय फायद्यासाठी वापर करत असून, मुद्दाम हा कार्यक्रम निवडणुकीच्या तोंडावर आखण्यात आल्याचे आरोप होत आहेत. मात्र, त्यात काहीच तथ्य नसल्याचं देशपांडे यांनी दिलेल्या पुढील माहितीवरून स्पष्ट होते. त्यांनी सांगितलं की, “वर्ष २०२४ च्या सुरुवातीला १५ जानेवारी रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. याच दिवशी उत्तरायणाला सुरुवात होत असून यामध्ये सात्विक प्रकृती असलेल्या देवतांची स्थापना केली पाहिजे, असे सांगण्यात आले आहे. ShriRam-Ayodhya मात्र, २५ जानेवारीपर्यंत पौष महिना येत असल्याने या काळात श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करायची का ? हा प्रश्न होता. ही बातमी नक्की वाचा ... श्रीराम मंदिर परिसरात एआय सुरक्षा तैनात त्यानुसार अभ्यास केला असता, बृहदैवज्ञ रंजन, विद्या माधवीय आणि मुहूर्त गणपती या दोन्ही ग्रंथांमध्ये पौष महिन्यात प्राणप्रतिष्ठा केली जाऊ शकते, असा उल्लेख आहे. या महिन्यात प्राणप्रतिष्ठा केल्यास राज्य वृद्धी होते असेही यामध्ये सांगण्यात आले आहे. याबरोबरच विद्यामाधवीय व गणपती दैवज्ञ यांच्या ग्रंथानुसार पौष व माघ महिन्यात कोणत्याही देवदेवतेची प्राणप्रतिष्ठा करता येते असाही उल्लेख सापडला. ShriRam-Ayodhya याचाच अर्थ श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पौष महिन्यात करता येऊ शकते, असे शास्त्रात संगितले आहे.”
 
तिथीबद्दल बोलायचे झाल्यास मुहूर्त चिंतामणी ग्रंथामध्ये तिथीबद्दल स्पष्ट उल्लेख असून, देवतेच्या तिथीप्रमाणे त्या देवतेचा निवास त्याच तिथीत असतो. याप्रमाणे, श्रीराम हे श्रीविष्णू यांचे अवतार समजले जातात द्वादशी ही विष्णूची तिथी सांगितली जाते त्यामुळे श्रीरामाच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी द्वादशीचीच तिथी योग्य आहे. ShriRam-Ayodhya वार कोणता असावा यावर मंगळवार सोडून प्रत्येक वार शुभ असल्याने सोमवार हा दिवस घेतला गेला. शिवाय, मुहूर्त चिंतामणी पीयूषधारा टिकेनुसार सर्व देवांसाठी सर्वश्रेष्ठ असलेल्या नक्षत्रांपैकी मृग नक्षत्र घेण्यात आले. अशा प्रकारे सोमवार २२ जानेवारी, २०२४ पौष शुद्ध द्वादशी रोजी संपूर्ण दिवस मृग नक्षत्र असताना अयोध्येच्या अक्षांश रेखांशानुसार मेष लग्नावरील विशिष्ट स्थिर नवमांश बघून हा मुहूर्त श्रीरामांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आला आहे, असे गौरव देशपांडे म्हणाले. ही बातमी नक्की वाचा ... २० ते २६ जानेवारीपर्यंत मुसलमानांनी घरातच रहावे !
 
ShriRam-Ayodhya गौरव देशपांडे हे महाराष्ट्रात गेली १३ वर्षे सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग प्रकाशित करीत आहेत. १४ वर्षे आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर अजूनही आपला आयटी व्यवसाय सांभाळून ते पंचांग आणि ज्योतिषशास्त्र यात उल्लेखनीय काम करत आहे. ShriRam-Ayodhya बंगळुरू येथील कुडली श्रृंगेरी पीठातर्फे त्यांना ज्योतिर्विद्या वाचस्पती ही उपाधी प्रदान करण्यात आली असून कुडली श्रृंगेरी पीठाचे अकरावे शंकराचार्य मठाधिपती श्री श्री विद्याविद्येश्वर भारती यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे. देशपांडे यांच्या भारतीय खगोलशास्रावर आधारित पंचांग अभ्यासाची दखल घेत सदर सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0