वेध
- अभिजित लिखिते
Ayodhya-Ram Mandir मंदिर आणि विकास परस्परपूरक घटक असतात. मात्र, अयोध्येतील राम मंदिराने हे दोन्ही घटक सर्वसमावेशक विकासासाठी परस्परपूरक असल्याचे सिद्ध केले आहे. राम मंदिर केवळ एका धर्माचे राहिलेले नाही. ते विकासाचे मंदिर झाले आहे. धार्मिक स्थळांमध्ये अर्थव्यवस्थेला गती देण्याची क्षमता असते, हे आजवर कळत असले, तरी कुणालाही ते वळत नव्हते. त्यासाठी राजकीय परिस्थिती किंवा तुष्टीकरणाचे राजकारण कारणीभूत होते. धर्म ही अफूची गोळी असल्याचे कार्ल माक्र्सने म्हटले होते. त्याच कालबाह्य झालेल्या विचारांवर काही जणांनी उड्या मारत राम मंदिराबाबत जीभ सोडली होती. मात्र, धर्म हे चैतन्याचे बीज असल्याचे अयोध्येतील राम मंदिराने सिद्ध केले आहे. Ayodhya-Ram Mandir याच चैतन्याने येथील अर्थकारणाला एक नवीन वेग दिला आहे. भारताला विकसित देश बनवण्याच्या मोहिमेला अयोध्येतून नवीन गती मिळत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच म्हटले होते. त्यांचे हे वाक्य शब्दशः खरे ठरत आहे. अयोध्येतील राम मंदिरामुळे केवळ अयोध्येचाच नव्हे, तर संपूर्ण उत्तरप्रदेशाचा कायापालट होणार आहे. केवळ एका मंदिरामुळे अयोध्येतील लोकांचे जीवनमान प्रचंड उंचावणार आहे.
![mandir mandir](https://www.tarunbharat.net/Encyc/2024/1/14/Untitled-1_202401141721281864_H@@IGHT_400_W@@IDTH_600.jpg)
अयोध्येत १५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या विकासकामांची पायाभरणी व उद्घाटन करण्यात आले आहे. Ayodhya-Ram Mandir आज देशातील धार्मिक स्थळांचे सौंदर्यीकरण केले जात आहे आणि केवळ इतकेच नव्हे तर डिजिटल तंत्रज्ञानाचा वापरही या तीर्थस्थळांकडून केला जात आहे. अयोध्येत केवळ राम मंदिराचीच उभारणी केली गेली नाही. येथील पायाभूत विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. येथे पायाभूत प्रकल्प अत्यंत वेगाने उभारले जात आहेत. राम जन्मभूमीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि फैजाबादचे अयोध्या हा केवळ एकच नामबदल नव्हता, तर एका भौगोलिक स्थानाच्या आणि राज्याच्या संपूर्ण कायापालटाची ती नांदी होती. Ayodhya-Ram Mandir पूर्वीच्या फैजाबादमध्ये फारसे कुणी फटकायचे नाही. आता अयोध्या हे एक जागतिक पातळीवरील धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे. हे एक जागतिक दर्जाचे पर्यटन शहर झाले असून, दररोज लाखो पर्यटकांना आकर्षित करेल आणि डझनभरापेक्षा जास्त शेजारच्या जिल्ह्यांच्या अर्थव्यवस्थेत क्रांती घडवून आणेल. अयोध्येच्या मास्टर प्लॅन २०३१ नुसार येथील पुनर्विकास १० वर्षांत पूर्ण केला जाईल आणि या महिन्यात राम मंदिराच्या उद्घाटनानंतर सुमारे तीन लाख लोकांची रोजची गरज भागवण्यासाठी या शहराच्या आधुनिकीकरणासाठी ८५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली जाणार आहे. Ayodhya-Ram Mandir
या व्हिजनमध्ये अयोध्या विकास प्राधिकरणाच्या ८७५ चौरस किमी क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा आणि पर्यटन विकासाची ओळख पटवण्यात आली. यामध्ये १३३ चौरस किमीचे मुख्य नियोजित शहर क्षेत्र आणि ३१.५ चौरस किमी मुख्य शहराचा समावेश आहे. अयोध्येला नवे रूप देण्यासाठी राज्य आणि केंद्राच्या ३७ यंत्रणा काम करीत आहेत. Ayodhya-Ram Mandir केवळ शहराचा कायापालट करण्यासाठी ३१,६६२ कोटी रुपयांचा खर्च केला जाईल. केवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण १० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांवर काम करीत आहे. उत्तरप्रदेश सार्वजनिक बांधकाम विभाग ७,५०० कोटी रुपयांच्या ३७ प्रकल्पांवर काम करीत आहे. अयोध्येच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळ, रेल्वे आणि महामार्गांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. राम मंदिराची उभारणी सुरू झाल्यापासून अयोध्येतील आर्थिक हालचाली प्रचंड वाढल्या आहेत. स्थानिक पातळीवरील व्यवसायांमध्ये तेजी आली. त्यामुळे लहान व्यावसायिकांचीही भरभराट सुरू झाली आहे.
Ayodhya-Ram Mandir अयोध्येच्या आसपासच्या भागांतील आर्थिक घडामोडींमध्ये वाढ होणार आहे आणि शहराचा विस्तार राष्ट्रीय राजधानी क्षेत्राप्रमाणे होणार आहे. स्थानिक बाजारात पैसा फिरायला लागल्याने लोकांसाठीही नव्या आणि मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. हॉटेल इमारती उभारण्यासाठी परवानगी मागणारे कित्येक अर्ज स्थानिक प्रशासनाला मिळत आहेत. त्यासोबत खाद्यसेवा शृंखलाही अयोध्येत दाखल झाल्या आहेत. रामललाची प्राणप्रतिष्ठा आणि त्यानंतर पर्यटकांच्या संख्येत कितीतरी पटींनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Ayodhya-Ram Mandir पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन कितीतरी कंपन्या अयोध्येत प्रकल्प टाकण्याचा विचार करीत आहेत. त्यामुळे केवळ अयोध्याच नव्हे, तर आसपासच्या भागांमध्येही रोजगाराच्या संधी वाढतील. नवीन व्यवसाय, व्यापार सुरू करण्याच्या संधी वाढतील. २०२१ मध्ये ३ लाख २५ हजार पर्यटकांनी अयोध्येला भेट दिली होती. ही संख्या २०२२ मध्ये २ कोटी ३९ लाख पर्यटकांवर पोहोचली होती. यावरून अयोध्येत भविष्यात होणाèया उलाढालीचा अंदाज लक्षात येऊ शकतो.
९०२८०५५१४१