आमदार अपात्रतेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

    दिनांक :14-Jan-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
disqualification of MLA राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिल्यानंतर पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात मंगळवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी एकत्रित आमदार अपात्रता disqualification of MLA प्रकरणी सुनावणी होणार आहे.
 
 
disqualification of MLA
 
राहुल नार्वेकर यांनी कोणालाही अपात्र disqualification of MLA न ठरवता शिवसेना पक्ष शिंदेंना दिला. त्यानंतर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची भूमिका जाहीर करण्यात आली. पण, अद्याप राहुल नार्वेकरांच्या निकालाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आली नाही. त्यामुळे १६ जानेवारी रोजी सुनावणी झाल्यास शिवसेना आणि राकाँच्या आमदार अपात्रतेवर एकत्रित सुनावणी होईल.
 
एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. त्याचसोबत, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हीप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हीप अध्यक्षांनी अवैध ठरवला. disqualification of MLA त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला.
शरद पवार गटाची धाकधूक वाढली
disqualification of MLA राहुल नार्वेकरांनी शिवसेनेबाबत निर्णय देताना पक्ष संघटनेपेक्षा विधिमंडळातील बहुमताचा विचार केला. त्यामुळे ठाकरे गटाला धक्का तर बसला, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची धाकधूकही वाढली आहे. कारण, विधिमंडळातील बहुमत सध्या अजित पवार गटाकडे आहे. राकाँच्या पक्ष आणि चिन्हावर अजित पवारांनी दावा केला असून, हा वाद निवडणूक आयोगात पोहोचला आहे. दोन्ही बाजूंकडून त्या संबंधित युक्तिवाद सुरू असून, कागदपत्रेही जमा करण्यात आली आहेत. आता निवडणूक आयोग त्यावर काय निर्णय घेते हे पाहावे लागेल.