तभा वृत्तसेवा
भंडारा,
J. M. Patel College : 14 जानेवारी गोंदिया शिक्षण संस्थे व्दारे संचालित जे. एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. जयंती समारोहाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रसिध्द वैज्ञानिक डॉ. कुमुद रंजन ( सिंगापूर), मनीष वंजारी व प्रथमेश फुलेकर विचारपीठावर उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विकास ढोमणे होते.
मनीष वंजारी व प्रथमेश फुलेकर यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करुन विद्यापीठाव्दारे विद्यार्थी विकास विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची विस्तृत माहिती दिली. J. M. Patel College या प्रसंगी त्यांनी विद्यार्थी वैद्यकीय मदत निधी, कमवा आणि शिका उपक्रम, सावित्रीबाई फुले बस पास योजना, उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार योजना, विद्यार्थी विमा योजना अशा विविध योजनांचा उल्लेख केला. अशा विविध योजनांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सिनेट सदस्य प्रसिध्द वैज्ञानिक डॉ. कुमुद रंजन यांनी वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी भारताला बेसिक सायन्सवर भर देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. J. M. Patel College देशातील स्थानिक समस्यांना संशोधानाचा विषय करण्याचे आवाहन त्यांनी युवकांना केले. तसेच डॉ. सी.व्ही. रमण यांच्या नंतर विज्ञान विषयात आपण आजपर्यंत दुसरे नोबल प्राप्त करु शकलो नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आपल्या अध्यक्षीय संबोधनात प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची माहिती दिली. स्वामी विवेकांनद हे पाश्चात्य वैज्ञानिक व भारतीय आध्यात्मीक विचार प्रवाहांचे उत्कृष्ट समन्वय असल्याचे त्यांनी नमुद केले. त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोणाची धर्माशी योग्य सांगड घालण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अजय घाटोळे व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पनिक्कर यांनी केले तर प्रा. भोजराज श्रीरामे यांनी उपस्थितांचे आभार मानले. J. M. Patel College कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. गिरधारीलाल तिवारी, डॉ. भावना राय, डॉ. पंकज गौर, रुपेश मोहतुरे आदिंचे मोलाचे सहकार्य लाभले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.