अ‍ॅपलला मागे टाकत मायक्रोसॉप्ट अव्वल

कंपनीचे बाजार भांडवल २,८७५ ट्रिलियन डॉलर्स

    दिनांक :14-Jan-2024
Total Views |
वॉशिंग्टन, 
Microsoft overtakes Apple जगातील ख्यातनाम टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने अ‍ॅपल कंपनीला पिछाडीवर टाकत जगातील नंबर एकची कंपनी होण्याचा बहुमान पुन्हा प्राप्त केला आहे. Microsoft overtakes Apple ११ जानेवारी रोजी या कंपनीचे बाजार भांडवल अ‍ॅपलपेक्षा अधिक झाले.
 
 
Microsoft overtakes Apple
 
Microsoft overtakes Apple या दिवशी कंपनीचे शेअर्स १.६ टक्क्यांनी वाढले. यामुळे कंपनीचे बाजार भांडवल तब्बल २,८७५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहचले. याचवेळी अ‍ॅपलचे शेअरर्स ०.९ टक्क्यांनी घसरले. त्यामुळे कंपनीचे बाजार भांडवल २,८७१ ट्रिलियन डॉलर्सवर आले. यावर्षी सुरुवातीच्या आठ दिवसांपासूनच अ‍ॅपलचे शेअर्स घसरण अनुभवत आहेत.
 
Microsoft overtakes Apple कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आता मायक्रोसॉफ्टसाठी वरदान ठरत आहे. यामुळेच गुंतवणूकदार कंपनीला खूप पसंत करीत आहेत. २०२१ नंतर प्रथमच अ‍ॅपलच्या शेअर्सचे मूल्यांकन मायक्रोसॉफ्टपेक्षा कमी झाले. जानेवारीत गुरुवारपर्यंत अ‍ॅपलचे शेअर्स ३.३ टक्क्यांनी घसरले आहेत, तर मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये १.८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसले.
गेल्या वर्षी मायक्रोसॉफ्टच्या किमती अ‍ॅपलच्या तुलनेत ९ टक्क्यांनी वाढल्या होत्या. Microsoft overtakes Apple अ‍ॅपलच्या शेअर्समध्ये ४८ टक्के वाढ झाली होती, यादरम्यान मायक्रोसॉफ्टचे शेअर्स ५७ टक्क्यांनी वाढले होते. अ‍ॅपलचे बाजार भांडवल १४ डिसेंबर २०२३ रोजी शिखरावर होते. त्यावेळी कंपनीचे बाजार भांडवल ३.०८१ लाख कोटी डॉलर्स होते.
 
अमेरिकन शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, मायक्रोसॉफ्ट कंपनी अ‍ॅपलला मागे टाकेल हे जवळजवळ निश्चित होते; कारण मायक्रोसॉफ्टची वाढ वेगाने होत आहे. या कंपनीला जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फायदा मिळत आहे.
मागणीत घट झाल्याने अ‍ॅपलला संघर्ष Microsoft overtakes Apple अमेरिकेनंतर अ‍ॅपलसाठी चीन ही सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. मात्र, मागील काही महिन्यांत चीनमध्ये अ‍ॅपल आयफोनची विक्री कमी होत आहे. २०२४ च्या पहिल्या आठवड्यात ही ३० टक्क्यांंपर्यंत होती तसेच चिनी कंपन्यांची स्पर्धा आणि चीनमध्ये वाढती अमेरिकाविरोधी भावना यामुळे अ‍ॅपल कंपनीला आव्हानांचा सामना करावा लागत आहे.