आजपासून राहुलची 'भारत जोडो न्याय यात्रा'

14 Jan 2024 09:59:31
नवी दिल्ली,  
Bharat Jodo Nyaya Yatra काँग्रेस रविवारी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमधून 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू करणार आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे इम्फाळजवळील ठोबल येथे यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील.
 
Bharat Jodo Nyaya Yatra
 
67 दिवसांत ही यात्रा 15 राज्ये आणि 110 जिल्ह्यांतून जाणार असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईत समारोप होईल. या कालावधीत अंदाजे 6,700 किलोमीटरचे अंतर कापले जाईल. Bharat Jodo Nyaya Yatra ही यात्रा मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0