जनरल नरवणे यांचे अभिनंदन !

14 Jan 2024 17:54:04
दिल्ली दिनांक
 
- रवींद्र दाणी
four stars of destiny ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचे हे आत्मचरित्र एप्रिल महिन्यात प्रसिद्ध होणार असले, तरी त्यातील एका माहितीसाठी जनरल नरवणे यांचे अभिनंदन केले पाहिजे. २० हुतात्म्यांचा बदला! : २०२० सालातील १५-१६ जूनच्या रात्री चिनी सैन्यासोबत झालेल्या गलवान संघर्षात भारताचे २० जवान हुतात्मा झाले. four stars of destiny पण, या २० हुतात्म्यांचा बदला भारताने कसा घेतला, किती घेतला याचा तपशील बाहेर येत नव्हता. चीनने आपले फक्त चार-पाच सैनिक ठार झाल्याचे मान्य केले होते. जनरल नरवणे यांच्या पुस्तकात याची अधिकृत माहिती समोर आली आहे. त्यानुसार भारतीय जवानांनी ३८ चिनी सैनिकांना कंठस्नान घातल्याची माहिती देण्यात आली आहे. four stars of destiny  काही सूत्रांनी तर चीनच्या मृत सैनिकांचा आकडा ४५ असल्याचे म्हटले आहे. यात ऑस्ट्रेलियाची वेबसाईट ‘क्लॅसॉन'ने सविस्तर वृत्त दिले होते. अनेक चिनी सैनिक गलवान नदी ओलांडताना वाहून गेले. four stars of destiny या सैनिकांचे पार्थिव प्रथम ‘शिक्यानवे' दफनभूमीत नेण्यात आले. नंतर या सैनिकांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताकडून ४५ चिनी सैनिक ठार झाल्याचा दावा केला जात होता. हा ४५ चा आकडा बाजूला ठेवून ३८ चा आकडा मान्य केला तरी भारताने २० चा बदला ३८ ने घेतला, हे जनरल नरवणे यांच्या पुस्तकातील सर्वात मोठे सत्य आहे. four stars of destiny वाढदिवसाची भेट : १६ जून हा चिनी राष्ट्रपती जिनपिंग यांचा वाढदिवस! चिनी राष्ट्रपती आपला २०२० चा वाढदिवस कधीही विसरू शकणार नाहीत, अशी टिप्पणी नरवणे यांनी केली आहे; जी अगदी मार्मिक आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला भारतीय सैनिकांनी दिलेले उत्तर जिनपिंग यांच्या कायम लक्षात राहावे असे होते.
 
 

four stars of destiny
 
 
भूतान-नेपाळ : जनरल नरवणे यांनी पुस्तकात सांगितलेली आणखी एक बाब म्हणजे, गलवानमध्ये भारत-चीन यांच्यात तणाव वाढला असताना चीन नेपाळ आणि भूतान यांनाही धमकावित होता. four stars of destiny वास्तविक, हे देश चीनचे मित्र मानले जातात. पण, एका वेगळ्या दबावतंत्राचा वापर चीन कसा करीत आहे, याची जाणीव या पुस्तकातून येते. पुस्तकावर बंदी? : जनरल नरवणे यांच्या पुस्तकातील काही भाग गाळला जावा अन्यथा त्यावर बंदी घातली जाईल, अशा काही बातम्या प्रसारित होत आहेत. साऊथ ब्लॉक म्हणजे संरक्षण मंत्रालयात असलेले ‘बाबू' म्हणजे मुलकी अधिकारी असा विचार करू शकतात. वास्तविक, जनरल नरवणे यांनी कोणत्याही नियमाचा भंग केलेला नाही. त्यांनी आपल्या या पुस्तकाचा मसुदा याआधीच लष्कराकडे पाठविला आहे. लष्करप्रमुुखांनी आपले आत्मचरित्र लिहिणे व त्यात काही बाबींचा खुलासा करणे, ही तर परंपरा आहे. अनेक लष्करप्रमुखांनी ते केले आहे. four stars of destiny कारगिल युद्धाबाबत जनरल वेद मलिक यांनी लिहिलेल्या ‘फ्रॉम सरप्राईज टू व्हिक्टरी' या आत्मचरित्रात नवी माहिती देण्यात आली होती. १९७१ च्या युद्धाबाबत लेफ्ट. जनरल जेकब यांचे ‘सरेंडर अ‍ॅट ढाका' हे आत्मचरित्रही स्फोटक माहिती देणारे होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, संरक्षणमंत्री जनजीवनराम व जनरल माणेकशा यांच्यातील चर्चेचा त्यात सविस्तर संदर्भ देण्यात आला होता. त्यामुळे नरवणे यांच्या पुस्तकाला वेगळा निकष लावण्याचे कारण नाही.
 
केवळ अनास्था : साऊथ ब्लॉकमध्ये बसलेले ‘बाबू' लष्करी अधिकाऱ्यांबाबत कसे वागतात, याचे उत्तम उदाहरण १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे एक सेनापती लेफ्ट.जनरल हरबक्ष सिंग  यांच्या आत्मचरित्रात देण्यात आले आहे. पृष्ठ ३७८ वर ते लिहितात, ‘माझ्या सेवानिवृत्तीनंतर लगेच मी संरक्षण मंत्री जगजीवनराम यांना भेटलो. त्यांना भारत-पाक युद्धाबाबत ‘वॉर डिसपॅचेस' असणारे दोन खंड दिले. four stars of destiny मर्यादित वितरणासाठी ते प्रसिद्ध करण्यात यावेत, असे मी त्यांना सुचविले. नवोदित अधिकाऱ्यांना याचा फार फायदा होतो, हेही त्यांना सांगितले. अन्य देशात ही प्रथा असल्याचेही मी त्यांना सांगितले. पण, २५ वर्षे त्यावर संरक्षण मंत्रालयाने काहीच केले नाही. मग, मी संरक्षण मंत्री कृष्णचंद्र पंत यांना भेटलो. त्यांनी मला त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. परतताना मी संरक्षण मंत्रालयातील संयुक्त सचिवास भेटून सांगितले, १५ दिवसांत तुम्ही याबाबत निर्णय करा. अन्यथा मी निर्णय करेन. हरबक्ष सिंग यांनी बरोबर १५ दिवस वाट पाहिली. four stars of destiny पण, काहीही झाले नाही. शेवटी त्यांनी ते स्वत: प्रसिद्ध केले. देशाच्या इतिहासात असे दस्तावेज सरकारने प्रसिद्ध न करता, ते एखाद्या सेनापतीने प्रसिद्ध करण्याचा हा पहिला प्रसंग होता, असेही त्यांनी या आत्मचरित्रात नमूद केले आहे.
 
एक शल्य! : जनरल नरवणे यांनी आपल्या आत्मचरित्राला ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' हे समर्पक नाव दिले आहे. ते भारतीय लष्कराचे फोर स्टार जनरल होते. त्यातून त्यांनी हे नाव दिले असावे. जनरल नरवणे भारतीय लष्कराचे सीडीएस म्हणजे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' होऊ शकले नाहीत, हे एक शल्य राहील. four stars of destiny देशाचे पहिले सीडीएस जनरल विपीन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत अचानक निधन झाल्यावर सेवाज्येष्ठता व गुणवत्ता हे दोन्ही निकष लावता जनरल नरवणे यांची या पदावर नियुक्ती होणे अभिप्रेत होते. तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांमध्ये त्यांची सेवाज्येष्ठता सर्वात जास्त होती. पहिले दोन सीडीएस लष्करातून व्हावेत असे ठरविण्यात आले आहे. याचा फायदा त्यांना मिळावयास हवा होता. जनरल नरवणे यांना सीडीएस करण्यात आले असते तर कदाचित त्यांना आत्मचरित्राचे नाव बदलून ‘फाईव्ह स्टार्स ऑफ डेस्टिनी' करावे लागले असते. कारण, सीडीएसला पाच स्टार मिळतात. पण, डेस्टिनी म्हणजे नियतीच्या मनात ते नसावे. म्हणूनच संधी व योग्यता असूनही त्यांना हे पद मिळाले नाही आणि देश एका कर्तबगार सेनापतीस मुकला.
 
 
four stars of destiny मालदीवही... : नरवणे यांनी आपल्या पुस्तकात चीनचा धोका पुरेशा स्पष्ट शब्दात नोंदविला असतानाच, ताज्या घडामोडीत मालदीवच्या नव्या राष्ट्रपतींनी आपली पहिली विदेश भेट चीनला देण्याचा निर्णय घेतला. नवे राष्ट्रपती मोहम्मद मुईझू चीन समर्थक मानले जातात. राष्ट्रपती झाल्याबरोबर मुईझू यांनी मालदीवच्या भूमीवरून तेथे तैनात असलेल्या काही मोजक्या भारतीय सैनिकांना देश सोडावा लागेल, असे म्हटले होते. नंतर त्यांनी याबाबत अधिकृत घोषणाच केली. आता ही तुकडी बहुधा मायदेशी परतलीही असेल. मालदीववर चीनचे आर्थिक उपकार आहेत. four stars of destiny मालदीववर असलेल्या एकूण कर्जांपैकी २० टक्के एकट्या चीनचे आहे. त्या ओझ्याखाली चीनने मालदीवला भारतविरोधी भूमिका घेण्यास भाग पाडले आहे, असे आज तरी दिसून येते. दक्षिणेतील श्रीलंका अगोदरच चीनच्या नियंत्रणाखाली गेला आहे. श्रीलंकेचे हंबनटोटा बंदर चीनने केव्हाच गिळंकृत केले आहे. आता मालदीवनेही तोच मार्ग स्वीकारलेला दिसतो. मालदीव हा लहानसा देश आहे. पण त्याचे स्थान लष्करीदृष्ट्या फार महत्त्वाचे मानले जाते. कैलास पर्वतांच्या रांगांमध्ये असलेल्या गलवान नदीचे पाणी मालदीवच्या समुद्रापर्यंत जाणून पोहोचले आहे, असाच या साऱ्या घटनांचा निष्कर्ष काढला जाईल.
Powered By Sangraha 9.0