संक्रमणाची आवश्यकता !

makar sankranti-uttarayan प्रत्येकाच्या घरी जाऊन अक्षता

    दिनांक :14-Jan-2024
Total Views |
कानोसा
 
- अमोल पुसदकर
makar sankranti-uttarayan संक्रमण म्हणजे पुढे जाणे. ‘थांबला तो संपला' असे एक वाक्य आहे. थांबलेले पाणीसुद्धा काही दिवसानंतर सडायला लागते. त्यामुळे जीवनामध्ये समोर जाणे, व्यवसायामध्ये समोर जाणे सामाजिक, आर्थिक सर्वच क्षेत्रांमध्ये समोर जाणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. हे संक्रमण होण्यासाठी काहीतरी चांगल्या प्रयत्नांची आवश्यकता असते. makar sankranti-uttarayan गर्दीच्या धक्क्यांमुळे जर कोणी समोर जात असेल तर त्याला संक्रमण म्हणता येणार नाही. एखादे ध्येय ठेवून, एखादा उद्देश ठेवून त्यासाठी प्रयत्न करून ज्यावेळेला व्यक्ती समोर जातो ते संक्रमण आहे. महाभारताच्या युद्धामध्ये पितामह भीष्म हे शरशय्येवर पडले होते. पितामह भीष्म इच्छामरणी होते तरीही त्यांनी आपला प्राण सोडलेला नव्हता. तसे पाहिले तर त्यांना जे काही कार्य करायचे होते ते करून झालेले होते. तरीही ते प्रतीक्षा करीत होते. makar sankranti-uttarayan ही प्रतीक्षा कशाची होती? तर मकर संक्रांतीची. पितामह शरशय्येवर पडले त्यावेळेला सूर्याचे दक्षिणायन सुरू होते. ते उत्तरायण सुरू होण्याची वाट पाहत होते. भगवद्गीतेत प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे की, उत्तरायणात प्राण त्याग करणारे लोक जन्म-मृत्यूच्या फेèयातून मुक्त होतात. पितामह भीष्मांनीसुद्धा उत्तरायण लागल्यावर ईहलोकाचा निरोप घेतला.
 
 

makar sankranti-uttarayan 
 
 
makar sankranti-uttarayan आमचे सण-उत्सव हे बहुराष्ट्रीय कंपन्यांना वाटले म्हणून किंवा त्यांचा माल खपावा म्हणून मार्केटिंगच्या योजनेंतर्गत निर्माण झालेले नाही, तर या सण-उत्सवांना एक अर्थ आहे. यांना आपली परंपरा आहे. हे हजारो वर्षांपासून सुरू आहेत. भारतामधल्या विविध राज्यांमध्ये मकरसंक्रांत हा सण साजरा केला जातो. कोणी याला ‘बिहू' म्हणतात, कोणी ‘पोंगल' तर कोणी ‘मकरसंक्रांती म्हणतात. महाराष्ट्रामध्ये या दिवशी आपण तीळगूळ एकमेकांना देतो. ‘तीळगूळ घ्या-गोड गोड बोला' असे म्हणतो. संस्कृतमध्ये एक वचन आहे, ‘सत्यं ब्रूयात'; ज्यामध्ये म्हटले आहे की, सत्य बोला, प्रिय बोला, सत्य असले तरी कटू बोलू नये. makar sankranti-uttarayan संक्रांतीच्या यानिमित्ताने एकमेकांच्या घरी जाणे, एकमेकांशी भेटणे, त्यांना तीळगूळ देणे व आपल्या संबंधांमध्ये पुन्हा एकदा मधुरता निर्माण करणे, हा या उत्सवाचा उद्देश आहे. आज आमच्या समाजामध्ये सामाजिक विद्वेष पसरविणाऱ्या अनेक संघटना कार्य करीत आहेत. जाती-जातीमध्ये भांडणे लावून आपले स्वार्थ सिद्ध करायला अनेक लोक टपले आहेत. पूर्वी आजच्याइतका शिक्षणाचा प्रचार नव्हता तरीही लोक ज्ञानी होते. समाज व्यवस्थेमध्ये प्रत्येक जातीचे आपले महत्त्व आहे. हे महत्त्व प्रत्येक जण ओळखून होता. makar sankranti-uttarayan आमच्या देशामध्ये जाती व्यवस्था नव्हती तर वर्ण व्यवस्था होती. यातील कोणताही वर्ण एकमेकांना कमी समजत नव्हता. वर्ण व्यवस्था ही कर्मावर आधारित होती. आज तसे काहीही राहिलेले नाही.
 
 
सर्वच जातीमध्ये सेवा देणारे लोक उपलब्ध आहेत. आज ‘सव्र्हिस इंडस्ट्री' म्हणजे सेवा क्षेत्र हे भारतातील सगळ्यात मोठे क्षेत्र झालेले आहे. इलेक्ट्रिशियनचे कार्य, प्लंबरचे कार्य, घर बांधणाऱ्या मिस्त्रीचे कार्य हे सर्व काय आहे? ही सर्व सेवाच आहे. makar sankranti-uttarayan प्रत्येक समाजाला अशा पद्धतीची सेवा देणाऱ्या लोकांची आवश्यकता असते. आजही या लोकांना कुणी कमी समजत नाही आणि पूर्वीही कोणी कमी समजत नव्हते. परंतु, इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा' या नीतीचा अवलंब केला व या ज्या जाती होत्या या जातींमध्ये वितुष्ट निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. १९४७ नंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर सरकारी योजना आणि कार्य यांच्यामुळे जातींमधले अंतर वाढतच राहिले. आता तर काय कुठल्याही मतदारसंघात ज्या लोकांची संख्या जास्त त्यांच्या जातीचा उमेदवार निवडून येऊ शकतो. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. makar sankranti-uttarayan त्यामुळे राजकीय पक्ष ‘कास्ट बेस पॉलिटिक्स' म्हणजेच जातीवर आधारित राजकारण करण्यामध्ये गुंतलेले आपल्याला आढळून येतात. असे असले तरीही अनेक संघटना मात्र समाजामध्ये एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आता घरोघरी अयोध्येच्या अक्षता वितरण करण्याचे कार्य सुरू आहे. या अक्षता वितरण करताना वस्तीमध्ये राहणारा कोणत्याही जातीचा असो, पंथाचा असो त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन अक्षता देण्याचे कार्य सुरू आहे.
 
 
 
पूर्वी काही जातींना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, परंतु आता तर प्रत्येकाला मंदिरात या असे सन्मानाने बोलावले जात आहे, हे परिवर्तन आहे, हेच संक्रमण आहे. makar sankranti-uttarayan आपल्या देशामध्ये साधू-संतांनी लोकांना जोडण्याचे कार्य केले आहे. वारकरी समाजामध्ये अठरापगड जातींचे संत आहेत. हे लाखो लोक केवळ एका विठ्ठलाच्या नावाने एकत्र आलेले असतात. ज्या काळामध्ये समाजामध्ये जातिभेद मोठ्या प्रमाणावर होता त्याही काळामध्ये वारकऱ्यांमध्ये जातिभेद नव्हता. तुकाराम महाराज म्हणतात, ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ.' जातीच्या नावावर लोक समाजामध्ये फूट पाडतात या गोष्टींनी स्वामी विवेकानंद व्यथित व्हायचे. एके ठिकाणी ते म्हणतात की, आमच्या देशामध्ये जे महापुरुष होऊन गेले त्यांनी जातीय सलोखा निर्माण करण्याचे कार्य केले नाही का? रामानुजाचार्य, दादू, गुरुनानक या सर्व संतांनी लोकांना एकत्र आणण्याचे काम केले नाही का? याचे उत्तर आहे की, साधू-संतांनी हे कार्य केलेले आहे. makar sankranti-uttarayan गुळामधील गोडी आणि तिळामधील तैलीय गुणधर्म जसे एकमेकांना धरून ठेवतात त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येकाने आपापल्या गोडीने एकमेकांना जोडून ठेवण्याचे कार्य केले पाहिजे. यातूनच सामाजिक समरसता निर्माण होईल.
 
 
 
तुच्छ राजकीय स्वार्थापोटी जे लोक समाजामध्ये दरी निर्माण करण्याचे कार्य करीत आहेत त्या लोकांना ओळखले पाहिजे. एके ठिकाणी तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जमलेल्या होत्या. त्या सर्वांचेच पोशाख जीन्स पॅन्ट, टी-शर्ट आणि केशरचना आधुनिक होती. ज्यांचा पेहराव आधुनिक आहे ते लोक आधुनिक असावे, असे मला वाटले. परंतु, त्यांचे विचार ऐकल्यानंतर असे लक्षात आले की, अनेक जातीयवादी शक्तींनी यांच्यामध्ये जातीयवादाचे विष पेरलेले आहे. makar sankranti-uttarayan त्यामुळे यांचा पोशाख जरी आधुनिक असला, तरी यांची मानसिकता संकुचित आहे. प्रत्येकाने आपल्या जातीसाठी काम करायला काही हरकत नाही. परंतु, आमच्या जातीने देशाच्या, समाजाच्या विकासामध्ये योगदान दिले पाहिजे. आम्ही समाजाला जोडून ठेवणारे लोक असलो पाहिजे, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. जातिपातीमधील एकोपा यानेच राष्ट्रीय एकात्मता बळकट होणार आहे. येणाèया काळामध्ये आमचा देश जर एकसंध ठेवायचा असेल तर इथला माणूस एकसंध ठेवला पाहिजे. त्यासाठी लोकांची मने एकत्र जोडून ठेवली पाहिजे. makar sankranti-uttarayan यासाठी वर्षातून एक वेळा कोणत्या ना कोणत्या निमित्ताने लोकांनी एकत्र यावे, प्रेमाने बोलावे आणि देशाच्या व समाजाच्या विकासासाठी कार्य करावे. याने समाज पुढे जाईल व यालाच आपण खरे मकरसंक्रमण म्हणू शकू...