पोटातून निघाला एक किलोचा गोळा

धारणी रुग्णालात महिलेवर शस्त्रक्रिया

    दिनांक :15-Jan-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
धारणी, 
Dharni Hospital : आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्राच्या धारणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातून तब्बल 1,130 ग्राम वजनी गोळा काढला.धारणी मुख्यालयापासून पंधरा किलोमीटर अंतरावरील लावादा गावातील कमला रामदास कास्देकर (45) या महिलेच्या पोटात दुखत असल्यामुळे तिने गुरुवारी धारणी उपजिल्हा रुग्णालय गाठले. येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. दयाराम जावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कमला कास्देकर हिची सोनोग्राफी करण्यात आली. ज्यामध्ये तिच्या पोटात गोळा असल्याचे निदर्शनास आले.
 
Dharni Hospital
 
महिलेच्या पोटात गोळा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर धारणी उपजिल्हा रुग्णालयातील स्त्री रोगतज्ञ डॉ. संजु ठाकरे, स्त्री रोगतज्ञ डॉ. प्रीती शेंद्रे, डॉ. तुसे, डॉ. जामकर यांच्या चमुने महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून पोटातील गोळा बाहेर काढला. Dharni Hospital गोळा बाहेर काढल्यानंतर वजन केले असता ते तब्बल 1,130 ग्रॅम एवढे भरले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. जावरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या पोटातून निघालेला गोळा हा आतापर्यंत झालेल्या शस्त्रक्रियेतील सर्वात जास्त वजनी गोळा आहे, जो यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला. सदर शस्त्रक्रियेसाठी रामकृष्ण शिंदे, धनराज आखाडे, डॉ. शैलेश जीराफे, सुशील तिवारी, राहुल तिवारी यांनी मोलाचे सहकार्य केले. महिलेच्या पोटातून निघालेल्या गोळ्याला पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. कमला कास्देकर यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.