शिवसेना संपर्क नेतेपदी अभिजीत अडसूळ

कार्यकर्त्यांनी केला सत्कार

    दिनांक :15-Jan-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
Abhijeet Adsul : शिवसेनेचे माजी आमदार तथा राष्ट्रीय सचिव कॅ प्टन अभिजीत अडसूळ यांची शिवसेना अमरावती जिल्हा विभागीय संपर्क नेतेपदी नियुक्ती झाली आहे. त्यांचा स्थानिक शिवसैनिकांनी सत्कार केला. अमरावती जिल्हा युवा सेनेतर्फे जिल्हाप्रमुख प्रवीण दिधाते यांनी शाल व पुष्पगुछ अभिजीत यांचा विशेष सत्कार केला.
 
Abhijeet Adsul
 
यावेळी प्रामुख्याने शिवसेना जिल्हाप्रमुख अरुण पडोळे, Abhijeet Adsul युवासेना लोकसभा अध्यक्ष निशांत हरणे, गोपाल अरबट, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नमिता तिवारी, रेखा खारोडे, युवा सेना जिल्हा समन्वयक अक्षय पवार, महानगर प्रमुख चंदू आठवले, विधानसभा अध्यक्ष शुभम परळीकर, तालुका प्रमुख मंगेश काळमेघ, शहर प्रमुख गोलु यादव, प्रथमेश बोबडे, मुकुल दुबे, यश काटोले, आयुष देशमुख, आकाश खडसे, आशिष इंगोले यांच्यासह अन्य सर्व पदाधिकारी उपस्थित होते.