अमित शहावर कोसळला दुःखाचा डोंगर

    दिनांक :15-Jan-2024
Total Views |
मुंबई,  
Amit Shah Sister Died केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मोठी बहीण राजेश्वरीबेन शाह यांचे आज मुंबईत निधन झाले. राजेश्वरीबेन या ६५ वर्षांच्या होत्या आणि त्या फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होत्या. महिनाभरापूर्वीच त्यांची अहमदाबादहून मुंबईतील रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. राजेश्वरीबेन शाह यांच्या निधनानंतर अमित शाह यांनी गुजरातमधील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

Amit Shah Sister Died
शाह यांच्या बहिणीच्या निधनाची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. राजेश्वरीबेन यांचे जाणे हा संपूर्ण शहा कुटुंबीयांना मोठा धक्का असल्याचे त्यांनी सांगितले. Amit Shah Sister Died मी वैयक्तिकरित्या या दु:खात सहभागी आहे आणि अमितभाई आणि संपूर्ण शहा कुटुंबीयांना हा धक्का सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. भाजपाच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की ती काही काळा पासून बरी नव्हती आणि तिच्यावर मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरू होते, जिथे तिने सोमवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला.
 
ते म्हणाले की त्यांच्या बहिणीच्या मृत्यूनंतर शाह यांनी त्यांचे दिवसभराचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. राजेश्वरीबेन यांचे पार्थिव आज सकाळी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले असून दुपारी थलतेज स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गांधीनगर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शाह रविवारपासून भाजपा समर्थकांसह मकर संक्रांत साजरी करण्यासाठी अहमदाबादमध्ये होते. सोमवारी ते बनासकांठा आणि गांधीनगर जिल्ह्यातील दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार होते. बनासकांठामधील देवदार गावात बनास डेअरीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन शहा यांच्या हस्ते होणार होते. दुपारी ते गांधीनगर येथील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठात विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार होते.