बोरी इचोड येथे अक्षता व कलशाची भव्य मिरवणूक

    दिनांक :15-Jan-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
Akshata and Kalash श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी रामललाची गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा 496 वषानंतर होणार आहे. त्या अनुषंगाने श्री अयोध्या येथील अक्षता कलश यांचे वितरण देशभरात प्रांताच्या रचनेनुसार करण्यात आले आहे. विदर्भ प्रांतात कलश आल्यानंतर जिल्हा, शहर, तालुका व ग्रामीण भागात अक्षता कलश पोहचण्यात आले. त्या अनुषंगाने शनिवार, 13 जानेवारी रोजी राळेगाव तालुक्यातील बोरी इचोड ग्रामवासींतर्फे अक्षता कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
Akshata and Kalash
 
या धार्मिक कार्यक्रमास बोरी इचोड येथील नागरिकांचा व महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. या कलश यात्रेमध्ये महिला, पुरुष व बालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अयोध्येतून आलेल्या अक्षदा कलशाची बोरी येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. या यात्रेची सुरुवात गावातील हनुमान मंदिर येथून टाळ मृदुंगाच्या गजरात मोठ्या उत्साहाने सुरुवात करण्यात आली. ग्राम प्रदर्शीना घालून घरोघरी अक्षदा कलशचे वाटप करण्यात आले. नंतर हनुमान मंदिर येथे आरती घेऊन अक्षता कलश यात्रा समाप्त करण्यात आली आहे. Akshata and Kalash यावेळी गावातील भजन मंडळी, शीला गमे, बेबी गमे, अंजना पारखी, वामन दुधळकर, तुकाराम सातघरे, नाना शिरसागर, चंदू महाजन, बालू महाजन, अक्षय महाजन, प्रमोद देठे, गोपाल भोयर, घर्षण गमे, पवन गमे, महेश आवारी, राहुल महाजन, मोहन आवारी, सचिन राजूरकर, दिनेश तोडासे, पंढरी तोडसाम, प्रदीप भोयर, शंकर देठे, हनुमान मेंढे, श्याम बोरा व गावातील महिला नागरिक मोठ्या सं‘येने सहभागी झाले होते.