खोट्यापेक्षा अर्धसत्य अधिक घातक विधानसभाध्यक्ष नार्वेकरांचा पलटवार

16 Jan 2024 23:42:36
मुंबई, 
Half-truth is more dangerous सर्व सत्य माहिती असूनही, खोटं बोलून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात आहे. खोट्यापेक्षा अर्धसत्य समाजासाठी अधिक घातक असते, Half-truth is more dangerous अशा शब्दांत विधानसभाध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकरांनी पलटवार केला.
 
 
Narvekar
 
Half-truth is more dangerous आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे गटाकडून पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले. यातून राहुल नार्वेकर, निवडणूक आयोग आणि राज्यपालांवर हल्लाबोल करण्यात आला. त्यानंतर नार्वेकर यांनी पत्रपरिषद घेऊन ठाकरेंवर पलटवार केला. ते म्हणाले, आपण सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या चौकटीत राहून आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या घटनेच्या आधारे निर्णय घेतले. Half-truth is more dangerous सुप्रीम कोर्टाने मला दिलेला आदेश पाहिला तर, त्यात मला असे सांगितले होते की, आधी मूळ राजकीय पक्ष कोणता, हे ठरवा आणि ते ठरवत असताना दोन गटांत घटनेच्या संविधानावरून वाद असतील तर, तुम्ही निवडणूक आयोगाकडे जी घटना आहे, त्याचा आधार घ्या.
जनता सूज्ञ, योग्य निर्णय घेईल
झोपलेल्यांना जागे करता येते, पण झोपल्याचे सोंग घेतलेल्यांना जाग करता येत नाही. सत्य माहिती असताना Half-truth is more dangerous खोटी माहिती देऊन जनतेची कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी, जनतेला गृहीत धरून चालत नाही. राज्यातील जनता सूज्ञ आहे. अंतिम निर्णय ते घेतीलच, असेही नार्वेकर म्हणाले.
१९९९ नंतरची घटना उपलब्ध नाही
Half-truth is more dangerous मी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आणि पक्षाची घटना मागवून घेतली, पण १९९९ चीच घटना आपल्याकडे असल्याचे आयोगाने कळविले. शिवसेनेची घटना सुधारित आहे का, याबाबत विचारणा केली असता, आयोगाने सांगितले की, १९९९ नंतरची कोणतीही घटना अथावा सुधारणाविषयक कुठलेही कागदपत्र आमच्याकडे उपलब्ध नाही. उध्दव ठाकरे गटाकडून २०१३ आणि २०१८ ची घटना दुरुस्ती दिल्याचा दावा खोटा असल्याचे सांगताना, नार्वेकर यांनी २०१३ आणि २०१८ चे पत्र वाचून दाखवत ठाकरेंचे पितळ उघडे पाडले.
Powered By Sangraha 9.0