’चलो अयोध्या’ अभियान अंतर्गत रामभक्तांनसाठी सुवर्णसंधी

18 Jan 2024 16:00:30
11 फेब्रुवारीला नागपूरहून विशेष ट्रेन सुटणार
अयोध्येसाठी 4 विशेष गाड्या सुटणार
नागपूर,
Chalo Ayodhya campaign अयोध्येत श्रीरामलला मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर श्रीरामाच्या दर्शनासाठी ’चलो अयोध्या’ अभियान सुरू करण्यात येत आहे. प्रतिष्ठापना सोहळाकरिता अयोध्येत उपस्थित राहणे अशक्य असल्याने नागपूरसह संपूर्ण विदर्भातील विविध संघटनांचे कार्यकर्ते 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान अयोध्येला जाण्याच्या तयारीत लागले आहेत.
 
 
Chalo Ayodhya campaign
 
विशेषत: भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि विहिंपशी संबंधित 2 हजार पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते अयोध्येकरीता 11फेब्रुवारी रोजी नागपूर रेल्वेस्थानकावरुन रवाना होणार आहे. Chalo Ayodhya campaign यासाठी एक स्पेशल रेल्वेचे बुकींग केल्या जाणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रशांत तितरे यांनी दिली.
स्पेशल रेल्वेची व्यवस्था
अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी नागपुरातील रामभक्तांना दर्शनासाठी 14 फेब्रुवारीची तारीख देण्यात आल्याने 11 पासून 4 विशेष रेल्वेगाड्या अयोध्येसाठी सोडण्यात येणार आहेत. याशिवाय प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून 6 हजार आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 2 हजार रामभक्तांना अयोध्येचे दर्शन घडविल्या जाणार आहे. त्याबाबत सविस्तर नियोजन केल्या जात आहे. एकाचवेळी गर्दी करण्यापेक्षा वेगवेगळया तारखेला नागपुरात स्पेशल रेल्वेची व्यवस्था केल्या जाणार आहे. नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकावरुन विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याने रामभक्तांना अयोध्या राम मंदिर ट्रस्टच्या वतीने दर्शनाची व्यवस्था करुन दिल्या जाणार आहे.
  विविध कार्यक्रमात सहभाग
प्रवास व्यवस्थेसोबत इतर सुविधांबाबत नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक पदाधिकार्‍यांकडे रामभक्तांची नावे निश्चित झाल्यानंतर रेल्वेचे आरक्षण करण्यात येणार आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपआपल्या घराच्या परिसरात आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रदेश मंत्री गोविंद शेंडे यांनी दिली.
60 विशेष गाड्यांची मागणी
विहिंपच्या चलो अयोध्या अभियानात सहभागी रामभक्तांची भोजनाची जबाबदारी विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे. विदर्भातील विहिंपकडून अयोध्येत महाप्रसादाचे कार्यक्रम महिनाभर चालणार आहे. अयोध्येतील प्रभू रामाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 60 विशेष गाड्यांची मागणी रामभक्तांनी केली आहे. 
Powered By Sangraha 9.0