’चलो अयोध्या’ अभियान अंतर्गत रामभक्तांनसाठी सुवर्णसंधी
दिनांक :18-Jan-2024
Total Views |
11 फेब्रुवारीला नागपूरहून विशेष ट्रेन सुटणार
अयोध्येसाठी 4 विशेष गाड्या सुटणार
नागपूर,
Chalo Ayodhya campaign अयोध्येत श्रीरामलला मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर श्रीरामाच्या दर्शनासाठी ’चलो अयोध्या’ अभियान सुरू करण्यात येत आहे. प्रतिष्ठापना सोहळाकरिता अयोध्येत उपस्थित राहणे अशक्य असल्याने नागपूरसह संपूर्ण विदर्भातील विविध संघटनांचे कार्यकर्ते 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान अयोध्येला जाण्याच्या तयारीत लागले आहेत.
विशेषत: भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि विहिंपशी संबंधित 2 हजार पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते अयोध्येकरीता 11फेब्रुवारी रोजी नागपूर रेल्वेस्थानकावरुन रवाना होणार आहे. Chalo Ayodhya campaign यासाठी एक स्पेशल रेल्वेचे बुकींग केल्या जाणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रशांत तितरे यांनी दिली.
विविध कार्यक्रमात सहभाग
प्रवास व्यवस्थेसोबत इतर सुविधांबाबत नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक पदाधिकार्यांकडे रामभक्तांची नावे निश्चित झाल्यानंतर रेल्वेचे आरक्षण करण्यात येणार आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपआपल्या घराच्या परिसरात आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रदेश मंत्री गोविंद शेंडे यांनी दिली.