सहकारच्या आर्यन गरुड ची विदर्भाच्या क्रिकेट संघात निवड

18 Jan 2024 20:30:22
बुलडाणा,
Vidarbha Cricket Team : सहकार विद्यामंदिर क्रिकेट अकॅडमीचा आर्यन माधवराव गरुड याची 14 वर्ष वयोगटाखालील विदर्भाच्या क्रिकेट संघात निवड झालेली असुन आर्यन हा गेल्या चार वर्षापासुन सहकार विद्यामंदिर क्रिकेट अकॅडमी, बुलडाणा येथे नियमीत त्याची व्हि.सी.ए. संघात लेगस्पीन गोलंदाज म्हणुन निवड झाली आहे.
 
Vidarbha Cricket Team
 
सहकार विद्यामंदिर क्रिकेट अकॅडमीमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व क्रिकेटच्या सुवीधा, उत्कृष्ठ प्रशिक्षक, उत्तम विकेट, व प्रशस्त इनडोर या सर्व सुविधामुळे आपण इथपर्यंत पोहचल्याची कबुली आर्यन याने दिली. आर्यनचे वडील महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असुन बुलडाणा जिल्हयातील पोलीस स्टेशन बुलडाणा ग्रामीण येथे ठाणेदार आहेत. Vidarbha Cricket Team आर्यन आपले यशाचे श्रेय आपले प्रशिक्षक संस्थेच्या अध्यक्षा कोमल झंवर, आई-वडील सर्व शिक्षक यांना देतो. त्याच्या या निवडीबद्दल बुलडाणा आर्बनचे संस्थापक राधेशाम चांडक , कार्यकारी अध्यक्ष सुकेश झंवर, बुलडाणा जिल्हा क्रिकेट कमिटी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
Powered By Sangraha 9.0