नवी दिल्ली,
Ayodhya Weather Forecast अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता केवळ चार दिवस शिल्लक आहेत. या काळात आणि प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी अयोध्या आणि परिसरातील Ayodhya Weather Forecast हवामान कसे असेल, याचा आधीच अचूक अंदाज घेण्यासाठी हवामान खात्याने ‘वेबपेज' उपलब्ध करून देण्याची घोषणा गुरुवारी केली.
Ayodhya Weather Forecast या वेबपेजमध्ये तापमान, आद्र्रता, वाऱ्याची गती यासह हवामानाशी संबंधित सर्व प्रकारची माहिती असून, ते हिंदी, उर्दू, चायनीज, फ्रेन्च आणि स्पॅनिश भाषेत उपलब्ध आहे. या वेबपेजमध्ये अयोध्या, प्रयागराज, वाराणसी, लखनौ आणि राजधानी दिल्लीसह महत्त्वाच्या ठिकाणांमधील हवामानाची माहिती त्याद्वारे प्राप्त करता येणार आहे. इतकेच नव्हे तर, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ देखील यामुळे माहिती होणार आहे.