तभा वृत्तसेवा
साकोली,
Swach Sundar Bus Station : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ या अभियान अंतर्गत मुल्यांकनावर गुणवत्ता चाचणीसाठी आज शुक्रवारी 19 जानेवारी ला साकोली आगारात वर्धा येथील राज्य परिवहन महामंडळाच्या चमुने भेट देत पाहणी केली. यावेळी बसस्थानक परिसरात संपूर्ण असलेल्या स्वच्छता व विविध उपक्रमांचे मुल्यांकन केले.
यावेळी Swach Sundar Bus Station राज्य परिवहन महामंडळ वर्धा येथील निरीक्षक विभाग नियंत्रक संदीप रायलवार, विभागीय अधिकारी देवानंद पुन्नमवार व चमुचे साकोली आगारात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी नगर उपाध्यक्ष जगन उईके, आगार व्यवस्थापक सचिन आगरकर व पत्रकार मंडळी उपस्थित होती.