यवतमाळ,
अध्यापन पदविका प्रशिक्षण महाविद्यालय यवतमाळ (दाते डीएड कॉलेज) येथे बुधवार, 17 जानेवारी रोजी Rangoli competition रांगोळी स्पर्धेचे आयोजन प्रा. नीता देवतळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. या रांगोळी स्पर्धेत डीएलएड प्रथम व द्वितीय वर्षार्ंचे 30 विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात आला. रांगोळी परीक्षणाचे काम प्रा. शितल माकोडे व प्रा. अश्विनी कासलीकर यांनी केले. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी तरडे, द्वितीय क्रमांक दिव्या भगत तर तृतीय क्रमांक ऋतुजा नागरगोजे आणि श्वेता वानखडे यांना विभागून देण्यात आला.
Rangoli competition : या रांगोळी स्पर्धेच्या मूल्यमापनानंतर बक्षीस वितरण करण्यात आले. या बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. श्रीकांत पर्बत, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. राजेश चव्हाण होते. याप्रसंगी पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली गिरी यांनी, प्रास्ताविक वैशाली सोवळे व आभारप्रदर्शन महेंद्र नैताम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदेमात्र्मने करण्यात आली.