संपूर्ण जनजीवन राममय

19 Jan 2024 22:48:39
नागपूर, 
Ram Mandir Ayodhya : अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्र 22 जानेवारीला भव्य मंदिरात विराजमान होत असून यानिमित्ताने संपूर्ण जनजीवन राममय झाले असून ‘सबके राम सबमे राम’ अशीच स्थिती असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
 
Ram Mandir Ayodhya
 
श्री रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा Ram Mandir Ayodhya उत्सव समितीचे संयोजक अमोल ठाकरे, सहसंयोजक गौरव जाजू, भावना भगत, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते चंदन गोस्वामी, विहिंपचे विदर्भ प्रांत मंत्री मिलिंद तितरे, निरंजन रिसालदार पत्रकार परिषदेला उपस्थित होते. गोविंद शेंडे म्हणाले की, अवघे नागपूर राममय झाले आहे. स्वातंत्र्य मिळाले होते त्यावेळेसही नसेल असे ‘न भुतो’ असा उत्साह समस्त रामभक्तांमध्ये आहे. जात-पात, धर्म- पंथ, राजकीय अभिनिवेश सोडून लोक 22 तारखेची त्या क्षणाची वाट बघत आहेत. गौरव जाजू यांनी सांगितले की, 362 वस्त्यांमध्ये (प्रति वस्ती 10 हजार नागरिक) प्रत्येकी 3 ते 4 मंदिर, असे एकूण 914 वस्त्यांमध्ये 22 जानेवारीला विविध कार्यक्रम व रात्री दीपोत्सव होणार आहे.
 
 
अमोल ठाकरे यांनी सांगितले की, 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा दिनी Ram Mandir Ayodhya अनेक ठिकाणी कार्यक‘म आयोजित केले जात आहेत. किन्नर समाजातर्फे वर्धा रोडवरील साई मंदिरात सकाळी 11 वाजेपासून भजन, आरती होईल. 40 ठिकाणी ढोल वाजवले जातील. गुरुद्वारा, मंदिरे व इतर अनेक ठिकाणी मोठ्या स्किनवर अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. घरे, इमारती, मंदिरांवर रोषणाई केली जात असून या सर्व ठिकाणी त्या दिवशी दीपोत्सव केला जाईल. चंदन गोस्वामी यांनी सांगितले की, प्रत्येक घर, प्रत्येक इमारत, प्रत्येक मंदिर तसेच सर्वत्र भगवे ध्वज, पताका लावल्या जात आहेत. आज भाजयुमोतर्फे रॅली काढण्यात आली. 21 जानेवारीला राजाबाक्षा मंदिरात सायंकाळी महाआरती होईल. स्वतः उपमंत्री देवेंद्र फडणवीस रामनगरातील राम मंदिरात उपस्थित राहतील.
आवाहन
सोमवारी 22 जानेवारीला दुपारी ठीक 12.29 वाजता अयोध्येत आरती Ram Mandir Ayodhya सुरू होईल. त्याचवेळेस सर्वत्र विविध मंदिरे वा इतर ठिकाणी आरती सुरू करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नागपुरात 1 जानेवारीपासून 5 लाख 32 हजार कुटुंबांना 6529 महिला, 8607 पुरुष, 1840 तरुण, असे एकूण 16976 रामभक्तांनी अक्षता व कार्यक‘मास येण्याचे निमंत्रण दिले. विदर्भात 46 हजार 750 रामभक्तांनी 40 लाख कुटुंबात अक्षता दिल्या.
Powered By Sangraha 9.0