अर्जुनीत श्रीराम रथयात्रेचे स्वागत

19 Jan 2024 17:28:06
सडक अर्जुनी, 
Shri Ram Rath Yatra : अयोध्येत प्रभू श्रीरामच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व भव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण 22 जानेवारीला होणार आहे. याचे औचित्य साधून खा. सुनील मेंढे यांच्या नेतृत्वात श्रीराम रथयात्रा काढण्यात आली आहे. या श्रीराम रथ यात्रेचे बुधवारी सडक अर्जुनी शहरात जोरदार स्वागत करण्यात आले.
 
Shri Ram Rath Yatra
 
सुरुवातीला शिवमंदिरात पूजा करून आरती करण्यात आली. खा. मेंढे यांच्या हस्ते अक्षता, निमंत्रण व दिव्यांचे वाटप करण्यात आले. यानंतर जयश्रीरामचा जयघोष करीत ही रथयात्रा गोरेगावकडे रवाना झाली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अनिल मुनीश्वर, धनीराम पातोडे, शेषराव गिरीपुंजे, धीरज अग‘वाल, डॉ. भुमेश्वर पटले, विनोद बारसागडे, Shri Ram Rath Yatra मधु अग्रवाल, युनूस पटेल, ओम प्रकाश टेंभुर्णीकर, निखिल मुनीश्वर अरविंद मेंढे, राहुल शहारे, भाविक गिरहेपुंजे, अंजली मुनीश्वर, वैशाली गिरीपुंजे, उषा जगताप, योगिता झिंगरे, तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, आरएसएस, भाजपचे व श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 22 जानेवारीला घरासमोर दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन खा. सुनील मेंढे यांनी उपस्थित भाविकाना केले.
Powered By Sangraha 9.0