श्रीराम भक्तांची शहरात अक्षता कलश यात्रा

    दिनांक :02-Jan-2024
Total Views |
बुलढाणा,
Akshata Kalash Yatra : केशव नगर, एकता नगर, महावीर नगर,सरस्वती नगर, लक्ष्मी नगर, अष्टविनायक नगर भागातील सर्व श्री राम भक्तांनी मोठ्या जल्लोषात अयोध्या येथून आलेल्या अक्षता कलशाची भव्य मिरवणूक काढली तेव्हा सर्व परिसर रामनामाच्या गजराने श्री रामाच्या घोषणाबाजीने अगदी दुमदुमून गेला होता.महिलांनी आप आपल्या घरासमोर व रस्ते रांगोळ्यानी सजवून वातावरण भक्तीमय करुन प्रत्येक भक्ताने अक्षदा कलशाचे आपल्या डोक्यावर घेऊन उस्फुर्तपणे स्वागत केले.
 
Akshata Kalash Yatra
 
मिरवणुकीत बैंड पथक , महिला भक्तांची गर्दी आणि फटाक्यांची आतिषबाजीने अक्षता कलश शोभायात्रेची शोभा वाढली . कलश शोभायात्रेत नगरातील श्री हणुमान मंदिर , श्री गजानन महाराज मंदिर, जैन मंदिर, गणपती मंदिर , विठ्ठल मंदिराच्या संचालक मंडळाने कलशाचे यथोचित स्वागत केले. शेवटी केशव नगरातील हणुमान मंदिर येथे Akshata Kalash Yatra शोभायात्रेची सर्वांना लाडूचा प्रसाद देवून सांगता झाली.
 
 
ह्या Akshata Kalash Yatra शोभायात्रेत प्रामुख्याने विभाग संघचालक चित्तरंजन राठी, भास्करराव बाहेकर , विश्राम पवार ,धऩंजय देव , विजयराव जोशी , मंदार बाहेकर, नगरसेविका सरला बाहेकर,उगले पत्की मामा, सतिश भाकरे, योगेश राजपूत, दिलीप पहाडे, विकास खक्के, अरविंद सैतवाल, शरद जैन यांची उपस्थिती होती.