यवतमाळ,
अनेक आजारावर अत्यंत प्रभावीपणे कार्य करणारे मुद्राशास्त्र ही महर्षी घेरंड ऋषींनी दिलेली एक मौलिक देण आहे. ‘घेरंड संहिता’ या ग्रंथात अनेक मुद्रांची विस्तृत माहिती दिलेली आहे. योग प्रशिक्षक ज्ञानेश्वर सुरजुसे यांनी या Mudra Pranayama Digital Data मुद्रांचा सखोल अभ्यास करून त्यासोबत पंचतत्त्व, पंचप्राण व सप्तचक्र यांचा समन्वय साधत प्रभावी योगिक प्रक्रिया तयार केली आहे व त्याचे लाभ अनेकांनी घेतले आहेत.
Mudra Pranayama Digital Data ही योगिक प्रक्रिया सर्वांना सहज व सुलभतेने उपलब्ध व्हावी व त्याचा लाभ व्हावा या हेतूने पत्रकार विजय बुंदेला यांनी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे 21 मुद्रांचा डिजिटल डेटा तयार करून त्याचा लोकार्पण सोहळा हॉटेल टुलिप येथे करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस राजू पडगिलवार, रेखा कोठेकर, शहर अध्यक्ष शंतनू शेटे, यवतमाळ विधानसभा प्रमुख बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले.
Mudra Pranayama Digital Data : आध्यात्मिक आघाडीचे रमेश अर्जापुरे यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सोहळ्याला माजी नगरसेवक विजय खडसे, नितीन गिरी, महिला आघाडी महामंत्री शैला मिर्झापुरे, नंदिनी अर्जापुरे, विजय गुल्हानेे, गोपाळ धोबे, मंगेश फुटाणे, संजय बारी या मान्यवरांची उपस्थिती होती. गरजवंतांनी या विनामूल्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विजय बुंदेला तथा यवतमाळ जिल्हा भाजपा आध्यात्मिक आघाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.