पोलीस मित्र क्रिकेट संघाने जिंकला नमो चषक 2024

20 Jan 2024 14:23:19
खामगांव :
Namo Cup2024 हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगलेल्या अतिशय चुरशीच्या सामन्यात नमो चषक 2024 वर पोलीस मित्र क्रिकेट संघाने आपले नाव कोरले.खामगाव मतदार संघाचे लाडके आ अँड आकाश फुंडकर यांचे नेतृत्वात खामगाव मतदार संघात भव्य नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सुरू आहे. यामध्ये नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका मैदान व श्रीक्षेत्र अटाळी येथे करण्यात आले.
 

namo chashak 
 
खामगाव येथे झालेल्या स्पर्धेत शहरातील एकूण 50 क्रिकेट संघ सहभागी झाले. खामगाव शहरातील ऐतिहासिक अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका मैदानावर तब्बल सात वर्षानंतर क्रिकेटचे सामने भरविण्यात आले होते. त्यामुळे खामगावातील क्रिकेट प्रेमी उत्साही होते. त्यांनी आठवडाभर या स्पर्धेचा आनंद लुटला. काल 19 जानेवारी रोजी झालेल्या अंतिम सामन्यात सुमारे दहा हजार क्रिकेट प्रेमी प्रेक्षक उपस्थित होते. आठवडाभर स्पर्धेतील सहभागी संघांनी चांगल्या प्रकारे खेळाडू वृत्तीने खेळून सर्वांची मने जिंकली. या स्पर्धेच्या अंतिम तीन संघातून ईश्वर चिट्ठी काढण्यात आली. त्यानंतर आ आकाश फुंडकर मित्र क्रिकेट संघ व पोलीस मित्र क्रिकेट संघात उपांत्यपूर्व सामना खेळविण्यात आला. यामध्ये पोलीस मित्र क्रिकेट संघाने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीमध्ये पोलीस मित्र क्रिकेट संघ व डायमंड क्रिकेट संघात अत्यंत चुरशीचा सामना रंगला. या अंतिम सामन्याची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. सहा षटकांच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत पोलीस मित्र क्रिकेट संघाने डायमंड क्रिकेट संघाला 103 धावांचे टार्गेट दिले. त्याचा पाठलाग करत डायमंड क्रिकेट संघ 92 धावा करू शकला. अशाप्रकारे 11धावांनी पोलीस मित्र क्रिकेट संघाने हा सामना जिंकला व नमो चषक 2024 वर आपले नाव कोरले. सुमारे दहा हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा अंतिम सामना रंगला. या अंतिम सामन्याचा आ अँड आकाश फुंडकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक सागरदादा फुंडकर, आदी मान्यवरांनी आनंद लुटला. अत्यंत खेळीमेळी च्या वातावरणात झालेल्या या स्पर्धेसाठी नमो चषक नियोजन समितीचे तसेच युवा मोर्चा शहराध्यक्ष राम मिश्रा, खामगाव मतदार संघ विद्यार्थी आघाडी संयोजक पवन गरड, रवी गायगोळ पाटील , गुलजम्मा शहा ,शशी वकटे ,विकी हत्तेल,रोहन जयस्वाल ,प्रतीक मिश्रा ,मयूर घाडगे, आशिष सुरेखा, शुभम देशमुख, राम बुंदेले विजय जयस्वाल ,गोलू आळशी आदींनी अथक परिश्रम केले. तसेच या सर्व स्पर्धेचे अतिशय उत्कृष्टरित्या समालोचन मिथिलेश पांडे यांनी केले.
 
 
Powered By Sangraha 9.0