शिरपूर जैन,
Ram Mandir : अयोध्या येथे होणार्या प्रभु श्रीराम यांच्या मुर्तीचे प्राणप्रतिष्ठे च्या निमित्ताने शिरपूर येथे प्रभु रामचंद्राच्या पुर्णाकृती पुतळ्याची सजवलेल्या रथातून व छोट्या धातुच्या मुर्ती ची पालखीतुन शोभायात्रा काढण्यात आली. सदर पालखी सोहळ्यात शिरपूर परीसरातील अनेक महीला व पुरुष भजनी मंडळे सामील झाले होते. टाळ मृदंगाच्या निनादात सदर पालखी सोहळा जात असतांना जागोजागी राम भक्तांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच जंगल ग्रृप शिरपूर जैन ने चहा पाण्याची व्यवस्था केली. सदर पालखी सोहळा दुपारी ३ वाजता आई भवानी संस्थान शिरपूर येथे पोहोचला.
तेथे आयोजकाच्या वतीने १९९२ साली शिरपूर येथुन आयोध्ये ला गेलेल्या कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. नंतर महाप्रसादाचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर पालखी सोहळ्यात महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष नंदकिशोर उल्हामाले, माजी पंस सदस्य अशोक देशमुख, कार सेवक डॉ. गजानन ढवळे, उमेश गिरडे, संतोष देशमुख, महिला तालुका अध्यक्षा अंजली देशमुख, शिरपूर शहर अध्यक्ष प्रदीप देशमुख, तालुका उपाध्यक्ष पंकज देशमुख, विश्वकर्मा योजना शिरपूर शहर अध्यक्ष अशोक कव्हळे, शिवशंकर आप्पा लाहे, संदिप कापकर, विश्व हिंदू परिषदेचे रामेश्वर ईरतकर, बजरंग दल चे रमेश ईरतकर, विद्यार्थी परिषदेचे तेजस मारवाडी व सुमित बरांडे आदीसह शेकडो महिला व पुरुष रामभक्त सोहळ्यात सामील झाले होते.
शिरपूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार श्री रामेश्वर चव्हाण यांनी मिरवणूक दरम्यान चोख बंदोबस्त ठेवला.