विशेष रोषणाई, फुलांनी सजले राम मंदिर

20 Jan 2024 22:31:07
अयोध्या,
Ram temple decorated रामललाच्या प्राणप्रतिष्ठेला आता अवघे दोन दिवस उरले आहेत. यासाठी प्रभू रामांची अयोध्या नगरी सजली असून, नव्यानेच बांधण्यात येत असलेले राम मंदिरही विशेष रोषणाई आणि फुलांनी Ram temple decorated सजविण्यात आले आहे. या विशेष सजावटीमुळे मंदिराचे सौंदर्य भूरळ पाडणारे असेच आहे.
 
 
Ram temple decorated
 
Ram temple decorated केवळ अयोध्येत नाही तर, संपूर्ण देशभरातील वातावरण राममय झाल्याचे पाहायला मिळत आहे. अयोध्येतील उत्साहाचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही. राम मंदिराची सजावट करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात विविध प्रकारांंची फुले आणण्यात आली आहेत. Ram temple decorated मंदिराची सजावट विशेष प्रकारची करण्यात आली आहे. ही सर्व फुले नैसर्गिक आहेत. कडाक्याचा हिवाळा असल्यामुळे पुढील काही दिवस ही फुले ताजी राहणार आहेत, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टशी संबंधित सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली. Ram temple decorated विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यासाठी विशेष पथक गठित करण्यात आले आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हे पथक काम करीत आहेत. प्रभू राम आणि राम मंदिराची प्रतिकृती दिसेल, अशा पद्धतीने विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. गर्भगृहाच्या आत पारंपरिक दिव्यांची आरास करण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0