अमेरिकेतील मंदिरे उत्सवासाठी सज्ज

    दिनांक :20-Jan-2024
Total Views |
वॉशिंग्टन,
Ram Mandir festivities २२ जानेवारीला होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी संपूर्ण भारत देश सज्ज आहे तसेच अमेरिकेतील शेकडो मंदिरांमध्येही मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. Ram Mandir festivities येथे हजारो भारतीय अमेरिकन उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
 
 
Ram Mandir festivities
 
Ram Mandir festivities अयोध्येत राममंदिर साकारत आहे. सनातन धर्म शाश्वत स्वरूपाचे प्रतीक आहे. ५०० वर्षांनंतर रामलला मंदिरात विराजमान होत आहे, याचा जगभरातील हिदूंना आनंद होत आहे. असे अमेरिकेच्या हिंदू विद्यापीठाचे अध्यक्ष कल्याण विश्वनाथन यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे.  ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत प्रभू रामाचे मंदिर उभारणे हा जगभरातील हिंदूंसाठी श्रद्धेचा आणि उत्सवाचा महत्त्वाचा दिवस असल्याचे टेक्सास येथील श्री सीता राम फाऊंडेशनचे कपिल शर्मा यांनी सांगितले. Ram Mandir festivities त्यांनी ह्यूस्टनमधील त्यांच्या मंदिरात श्री रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन केले आहे. उत्सवाची सुरुवात सुंदरकांडने होईल, त्यानंतर नृत्य, गायन आणि संगीताचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. यानंतर हवन आणि प्रभू रामाचा पट्टाभिषेक होईल. ज्याची सांगता प्रभू रामाची शोभायात्रा आणि प्रसाद वितरणाने होईल, असे कपिल शर्मा यांनी सांगितले.
 
Ram Mandir festivities मेरीलँडचे गव्हर्नर वेस मूर शनिवारी वॉशिंग्टन डीसीच्या उपनगरात राम मंदिर उत्सव कार्यक्रमाला उपस्थित होते. काही पाकिस्तानी अमेरिकन देखील ग्रेटर वॉशिंग्टन डीसी परिसरात उत्सवात सामील होत आहेत. भगवान श्रीरामाच्या लाखो अनुयायांचे बहुप्रतीक्षित स्वप्न आता सत्यात उतरणार आहे, असे अमेरिकेतील विश्व हिंदू परिषदेचे अमिताभ मित्तल म्हणाले. अमेरिकेमध्ये सुमारे १,००० मंदिरे आहेत आणि त्यापैकी जवळजवळ सर्व मंदिरांमध्ये रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्सव साजरा करण्यात येत आहे.