अयोध्या,
Mangal dhwani देशभरातील ५० पारंपरिक वाद्ये अयोध्येतील नवनिर्मिथ राम मंदिरात सोमवारी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दोन तास अगोदर भक्तीमय Mangal dhwani ‘मंगलध्वनी'चा भाग असतील.
अयोध्येतील ख्यातकीर्त कवी यतींद्र मिश्रा यांच्या या भव्य संगीत सादरीकरणाला नवी दिल्लीतील संगीत नाटक अकादमीने पाठिंबा दिला आहे. संगीताचा हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता सुरू होईल. प्राणप्रतिष्ठेचा सोहळा दुपारी १२.२० वाजता सुरू होणार आहे. Mangal dhwani संगीत सोहळ्यातील वाद्यांमध्ये उत्तरप्रदेशातील पखवाज, बासरी आणि ढोलका, कर्नाटकातील वीणा, पंजाबमधील अलगोजा, महाराष्ट्रातील सुंदरी, ओडिशातील मर्दाला, मध्यप्रदेशातील संतूर, मणिपुरातील पंग, आसाममधील नगारा आणि काली तसेच छत्तीसगडमधील तंबोऱ्याचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त दिल्लीतील शहनाई, राजस्थानातील रावणहथ, पश्चिम बंगालमधील श्रीखोल आणि सरोद, आंध्रप्रदेशातील घट्टम्, झारखंडातील सतार, गुजरातमधील संतार, बिहारमधील पखवाज, उत्तराखंड आणि नागस्वरममधील हुडका, तामिळनाडूतील ताविल आणि मृदुंगम्चाही यात समावेश आहे. Mangal dhwani मंदिर ट्रस्टच्या एका सदस्याने सांगितले की, या शुभ सोहळ्यासाठी विविध राज्यांतील ५० पेक्षा अधिक उत्कृष्ट वाद्ये एकत्र येऊन सुमारे दोन तास गुंजणार आहेत, अशी माहिती तीर्थक्षेत्र न्यासाच्या ससदस्याने दिली.